'हसण्यावर नियम नाहीत पण..' मराठी कलाकारांचं नाट्यरसिकांना आवाहन

marathi play
marathi play

मुंबई- कोरोना व्हायरससच्या कारणामुळे लॉकडाऊन असल्याने तब्बल नऊ महिन्यानंतर पुन्हा एकदा मराठी रंगभूमीवर तिसरी घंटा वाजणार आहे. लॉकडाऊनमुळे इतक्या महिन्यांनी पुन्हा प्रेक्षकांची भेट होणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी रंगकर्मी तितकेच उत्सुक आहेत. 'नाटक अनलॉक होतंय. सगळी काळजी घेऊन नाटकाला येताय ना…' असं हक्काचं आवाहन मराठी रंगकर्मींनी लाडक्या रसिक प्रेक्षकांना सोशल मिडीयावरुन केलं आहे.

लॉकडाऊनमुळे जवळपास नऊ महिने नाट्यगृह बंद असल्याने नाट्यप्रेमींना अनेक दर्जेदार नाटकांना मुकावं लागलं. गेल्याच महिन्यात नाटक पुन्हा सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली होती. त्यानंतर निर्मात्यांनी आणि कलाकारांनी देखील त्या दृष्टीने तयारीला सुरुवात केली होती. अखेर आता सगळ्यांची प्रतीक्षा संपली आहे. येत्या 12 डिसेंबरपासून प्रशांत दामले आणि कविता मेढेकर यांच्या 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकापासून पुन्हा रंगभूमीवर तिसरी घंटा वाजणार आहे. पुण्यातून या नाटकाचा पुन्हा शुभारंभ होतोय. त्यापाठोपाठ 19 डिसेंबरपासून भरत जाधव यांचे 'पुन्हा सही रे सही', 20 डिसेंबरपासून संकर्षण कऱ्हाडे यांचे 'तू म्हणशील तसं' यांच्यासह इतर व्यावसायिक नाटकही रंगभूमीवर दाखल होणार आहेत.

याबाबत प्रतिक्रिया देताना प्रशांत दामले म्हणाले,  ''एकीकडे थिएटर सुरू होऊन देखील तिथे प्रेक्षकांची कमी संख्या पाहायला मिळाली तर दुसरीकडे मात्र मराठी प्रेक्षकांनी नाटकाला भरभरून प्रेम दिल्याचं दिसून आलं. 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकाच्या 12 डिसेंबरच्या यशवंतराव चक्हाण नाट्यगृहातील प्रयोगाचे विंडो बुकिंग हाऊसफुल्ल झाले असून ऑनलाइन तिकिटे थोडीच शिल्लक राहिली आहे. रांगेतल्या पहिल्या रसिकाने तिकिटासाठी सकाळी 6.45 वाजता रांग लावली होती. आलेले रसिक 12, 8 आणि 6 या वेगाने तिकीट काढत होते. त्यामुळे अवघ्या एक तासात विंडो बुकिंग हाऊसफुल्ल झाल्याचं प्रशांत दामले यांनी सांगितलं. 

अभिनेते भरत जाधव यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ''वेळ ही घेतली. या कोरोनाच्या संकटातून आपली पूर्ण सुटका झाली नसली तरी आपण बऱयापैकी आता पूर्ववत झालोय. सर्व गोष्टींची काळजी आणि दक्षता घेऊन 8 महिन्यानंतर आता पुन्हा रंगमंचावर एन्ट्री घेतोय. आता नाटक अनलॉक होतंय..!!

कोरोनामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना आपल्याला अनेक नियमांचं पालन करावं लागतं. 'नाटक पाहताना हसण्यावर नियम नाहीत… पण मास्क काढू नका' असं आवाहन अभिनेते प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावरून रसिकांना केले आहे. याशिवाय प्रेक्षकांनी नाट्यगृहात येताना पुरेशी खबरदारी घ्यावी यासाठी नाट्यगृहात अर्धा तास आधीच या. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत रांगेने या, तुमचे तापमान तपासून, सॅनिटायझरने हात स्वच्छ करूनच नाटकाला या. दोन आसनांमध्ये एका खुर्चीचा वियोग आहे, पण तो तुमच्या फायद्यासाठीच आहे. त्याचं पालन करा आणि नाटकानंतरही बाहेर पडताना गर्दी करू नका असे पोस्टर्स कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या सुरक्षेची आपण काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.   

great response from drama lovers to the sale of tickets for the marathi play  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com