मुंबईतील रॅपर डिवाइनच्या प्रवासावरील 'गली बॉय'चा ट्रेलर प्रदर्शित (व्हिडिओ)

वृत्तसंस्था
बुधवार, 9 जानेवारी 2019

अभिनेता रणवीर कपूरच्या 'सिम्बा' आणि आलियाच्या 'राजी' या दोन दमदार चित्रपटानंतर आता पहिल्यांदाच ही जोडी एकत्र झळकणार आहे. 'गली बॉय' या चित्रपटातून ही जोडी सर्वांसमोर येत असून चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

मुंबई- अभिनेता रणवीर कपूरच्या 'सिम्बा' आणि आलियाच्या 'राजी' या दोन दमदार चित्रपटानंतर आता पहिल्यांदाच ही जोडी एकत्र झळकणार आहे. 'गली बॉय' या चित्रपटातून ही जोडी सर्वांसमोर येत असून चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

मुंबईच्या चाळ संस्कृतीतून रॅपर्सच्या दुनियेत नावलौकिक मिळवणाऱ्या डिवाईन म्हणजे विवियन फर्नांडिस आणि रॅपर नॅझी म्हणजेच नावेद शेख यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांपासून गली बॉयच्या कथानकासाठी प्रेरणा घेण्यात आली आहे. जवळपास तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये रणवीर आणि आलियाच्या दमदार अभिनयाची पुन्हा एकदा झलक पाहायला मिळते. सोशल मीडियावर हा ट्रेलर खूप गाजत आहे. यातल्या रणवीरच्या लूक आणि रॅपचं कौतुकही होत आहे. या चित्रपटात रणवीरने अभिनयासोबत रॅप साँग गाताना दिसणार आहे. हा रॅप ऐकून रणवीरचे चाहते भलतेचं खूश झाले.

दरम्यान, गली बॅाय या चित्रपटत रणवीर सामान्य मुंबईकरच्या भूमिकेत दिसत आहे. ज्याला रॅप करायला आवडतो. त्याच्या आयुष्यातील चढ -उतार, प्रेम आणि स्वप्न यांच्यामुळे त्याचे आयुष्य कसे बदलते हे सारं काही चित्रपटात पाहण्यास मिळणार आहे. या सिनेमात आलिया भट्टसोबत कल्की कोचलिन ही दिसणार आहे. रणवीर आणि आलियासोबतच एक मराठमोळी अभिनेत्रीदेखील या चित्रपटात झळकणार आहे. अभिनेत्री अमृता सुभाष यामध्ये रणवीरच्या आईच्या भूमिकेत आहे. झोया अख्तर दिग्दर्शित हा चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gully Boy Trailer Ranveer Singh Alia Bhatt Take Us On A Thrilling Musical Tour