मेलबर्न फिल्म फेस्टमध्ये 'गली बॉय'ला सर्वोत्कृष्ट!

सकाळ वृत्तसंस्था
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

- 'गली बॅाय' या चित्रपटाला मेलबर्न फिल्म फेस्टमध्ये बेस्ट फिल्म अवार्ड मिळाला आहे.

- आयएफएफएम ने या चित्रपटाला जनरेशन डिफआयनिंग फिल्म म्हणुन संबोधल आहे.

'गली बॅाय' या चित्रपटाला मेलबर्न फिल्म फेस्टमध्ये बेस्ट फिल्म अवार्ड मिळाला आहे. आयएफएफएम ने या चित्रपटाला जनरेशन डिफआयनिंग फिल्म म्हणुन संबोधल आहे. हा चित्रपट डिवाइन आणि नाझी या भारतीय रॅपर्जच्या जीवना वरून प्रेरित आहे.

एकीकडे जिंदगी ना मिलेगी दोबारा सारख्या सिनेमाच दिगदर्शन करणाऱ्या झोया अख्तरने धारावीतील एका कॅलेजच्या विद्यार्थ्याची कहाणी देखील तितक्याच सुंदरपणे आपल्या समोर मांडली. मुराद ज्याची आवड 'रॅप' करण्यात असते. ज्याला लिहायच असत, ज्याला सांगायच असत, ज्यच्यामध्ये ताल दडलेला असतो, अशा एका सर्वसाधारण मुलाचा असाधारण प्रवास झोया अख्तरने आपल्यासमोर मांडताना त्यात कुठेही आपल्याला नाराज व्हायला जागा ठेवली नाही.

रणवीर सिंह सारख्या अभिनेत्यामध्ये असलेला रॅपचा गुण तिने ओळखला आणि चित्रपटातील त्याच्या आवाजातील रॅपने आपली नाळ चित्रपटाशी जोडुन ठेवली. रणवीर सिंह ने साकारलेला मुराद हा प्रेक्षकाना आपलासा वाटला, तो वाटला अडकेलेला आणि त्याच बाहेर पडण नक्कीच त्याच्या सारख्या कित्येक मुरादना बळ देईल यात शंका नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#Repost @karanjohar ・・・ Gullyness@zoieakhtar @ranveersingh

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

आलिया भटने या चित्रपटात साकारलेली सिफना फिरदौसी ही मुरादची प्रेयसी असुन अतिशय धीट मुलगी आहे. आलियाने पात्रात जीव ओतला होता, त्याला वेगळेपण दिले होते ज्यामुळे आपण त्या पात्राच्या प्रेमात पडलो.

यात एक नवा चेहरा आपल्या समोर आला ज्याला प्रेक्षकांनी भरपुर प्रेम दिल. तो म्हणजे 'एमसी शेर' भोसले ह्याची भुमिका साकारणारा अभिनेता सिद्धार्थ चतुर्वेदी.  सिद्धार्थ चतुर्वेदी ह्याचा हा पहिला चित्रपट जरी असला तरी असे चित्रपटात कुठेच भासले नाही. एमसी शेरचा आत्मविश्वास सिद्धार्थने उत्क्रुष्टरित्या पडद्यावर मांडला. त्याने सिनेमामध्ये एक अनोखा तडका टाकला.

चित्रपटाच लेखन झोया अख्तर आणि रीमा कागती यांनी केले आहे. या जोडिने जिंदगी ना मिलेगी दोबारा मध्येही एकत्र काम केले होते. या दोन्ही स्त्रीयांची जोडी पडद्यावर जादु निर्माण करते हे स्पष्ट. गली बाॅय च्या लेखनातल वेगळेपण चित्रपटाच्या यशामागच खुप मोठ कारण आहे. ज्या प्रकारे मुराद आणि सफिना मधला रोमॅन्स रेखाटला आहे, ज्या प्रकारे श्वेता मेहता "स्काय" ह्या पात्राच लिखाण केल गेल आहे, समाजातील वर्ग पद्धतीवर केले भाष्य चित्रपटाचा कॅनफ्लिक्ट लिहीला गेला आहे यावरुन रीमा कागती ह्यांच्या लिखाणाने बॉलीवूडमध्ये एका नव्या पर्वाचा जन्म झाला अस म्हणायला हरकत नाही.

चित्रपटाशी संबंधीत सगळ्याच व्यक्तिंचा या यशामध्ये मोलाचा वाटा आहे अशी प्रत्क्रिया झोया अख्तर पुरस्कारा नंतर व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gully Boy wins best film award at Melbourne Film Fest!