लोक म्हणाले, मोहन जोशी आणि 'स्वामी समर्थ' अशक्य, पण शक्यही झालं आणि हीटही..

आज गुरुपौर्णिमा.. त्या निमित्ताने प्रवीण तरडे दिग्दर्शित 'देऊळ बंद' सिनेमाचा खास किस्सा..
guru paurnima special story of marathi movie deool band based on swami samarth maharaj
guru paurnima special story of marathi movie deool band based on swami samarth maharaj sakal

guru paurnima : आज गुरुपौर्णिमा. आजच्या दिवसाला आपल्याकडे अनन्यसाधारण महत्व आहे. महाराष्ट्राला गुरु परंपरेचा मोठा वारसा आहे आणि त्यातीलच एक महत्वाचे गुरु म्हणजे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ. स्वामींचा भक्त संप्रदाय अथांग आहे. त्यामुळे स्वामींच्या चरित्रावर आधारित चित्रपट किंवा मालिका कायमच लोकांच्या पसंतीस उतरतात. असाच एक चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शत झाला होता, ज्याचं नाव होतं 'देऊळ बंद..' त्यामुळे गुरुपौर्णिमेनिमित्त या चित्रपटाततील एक विशेष किस्सा..

(guru paurnima special story of marathi movie deool band based on swami samarth maharaj)

guru paurnima special story of marathi movie deool band based on swami samarth maharaj
‘अनन्या’चा 'तो' प्रवास उलगडणारे ‘तू धगधगती आग’ गाणे प्रदर्शित..

'देऊळ बंद' चित्रपट येणार याची मोठी चर्चा झाली होती. कारण या आधी आलेल्या देऊळ चित्रपटाने मराठीत मोठे यश मिळवले होते. त्यामुळे देऊळ बंद चित्रपटात काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या चित्रपटात 'स्वामी समर्थ' महाराज भेटीस येणार हि वार्ता सर्वत्र पसरल्याने स्वामींच्या भूमिकेत नेमकं कोण असणार याची उत्सुकता चाहत्यांना होती.

guru paurnima special story of marathi movie deool band based on swami samarth maharaj
मल्याळम अभिनेत्री निमिषा सजयन मराठीत, 'या' दिवशी 'हवाहवाई' प्रदर्शित..

स्वामींच्या भूमिकेसाठी कुणाचं कास्टिंग करायचं हा प्रवीण तरडे यांच्यापुढेही मोठा प्रश्न होता, कारण या आधीचित्रपट आणि मालिकांमधून दाजी भाटवडेकर, प्रफुल्ल सामंत अशा दिग्गज कलाकारांनी स्वामी समर्थ साकारले आहेत आणि त्याचा प्रभाव प्रेक्षकांवर बराचपडला होता. आजवर फोटो आणि चित्रपटातून दिसलेले स्वामी आणि तशाच पद्धतीचे स्वामी चित्रपटात उभे करणे हे मोठे आव्हान होते, आणि अखेर मोहन जोशी यांची निवड झाली.

,मोहन जोशी यांनी आजवर अनेक राजकीय, कौटुंबिक भूमिका साकारल्या आहेत. अगदी गाडगे बाबांची भूमिकाही त्यांनी केली आहे. पण स्वामी समर्थ आणि मोहन जोशी यांच्या चेहऱ्यात अजिबात साम्य नव्हते. त्यामुळे मोहन जोशी आणि स्वामी समर्थ हे समीकरण काही जुळणार नाही अशा शक्यता अनेकांनी वर्तवल्या होत्या. अगदी मोहन जोशी यांनाही याची खात्री नव्हती पण दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी ते शक्य केलं आणि केवळ शक्य नाही तर हिट करून दाखवलं. मोहन जोशी स्वामी समर्थ साकारू शकतील का असा प्रश्न करणाऱ्यांनी अक्षरशः चित्रपट सुरू असतानाच हात जोडले.

एका मुलाखतीत प्रवीण तरडे (pravin tarde) म्हणाले होते, 'स्वामींच्या भूमिकेसाठी कुणाला निवडायचं हा मोठा प्रश्नच होता. पण मोहन जोशी हेच स्वामी समर्थ साकारतील अशी मला खात्री होती. कारण त्यांचा अभिनय, अनुभव हा माझ्यासाठी महत्वाचा होता, बाकी चेहरेपट्टी कशी जुळवायची ते आमची जबाबदारी होती आणि ती आम्ही पार पाडण्यात आम्ही यशस्वी झालो. मोहन जोशी जेव्हा स्वामींच्या वेशात समोर आले तेव्हा आम्हीही आवाक झालो होतो,'असे ते म्हणाले.

तर एका मुलाखतीत स्वामींची भूमिका करणारे मोहन जोशी (mohan joshi) म्हणाले होते, ' माझ्या आजवरच्या कारकिर्दीतली ही वेगळी भूमिका होती. या भूमिकेसाठी मी पहिल्यांदा केस कापले. लंगोट लावून संबंध चित्रपटात वावरणे हे माझ्यासाठी थोडे दडपण देणारे होते पण चित्रपटाची टीम आणि स्वामींचे भक्त यांच्यामुळे ते शक्य झाला. या चित्रपटासाठी जेव्हा मला विचारल गेलं तेव्हा मी एक अट घातली होती. जर माझ्या लुक टेस्ट मध्ये मी स्वामी समर्थ यांच्या किमान जवळ जाण्यासारखा जरी दिसू शकलो तरच मी होकार देईन. सुदैवाने आमचे आर्टिस्ट महेश बराटे ह्यांनी स्वामींचा अभ्यास करून मला त्या रूपात तयार केलं आणि मी होकार दिला. हि भूमिका लोकांना इतकी आवडली हि आजही लोक चित्रपट आवडीने पाहतात.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com