'एचटूओ' सांगणार 'कहाणी थेंबाची'

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 March 2019

या पोस्टरमध्ये 'H2O' या चित्रपटाच्या नावासोबतच 'कहाणी थेंबाची' अशी टॅगलाईन देखील आहे. संपूर्ण कोरड्या आणि तडे गेलेल्या जमिनीवर पाण्याचे मोजकेच थेंब दिसत आहेत.

'H2O ' म्हटले की सर्वात आधी समोर येते ते म्हणजे पाण्याचे सूत्र. कारण पाण्याला वैज्ञानिक भाषेत 'H2O' ने संबोधले जाते. पण आता 'H2O' या नावाचा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मिडीयावर लाँच करण्यात आले. या पोस्टरमध्ये 'H2O' या चित्रपटाच्या नावासोबतच 'कहाणी थेंबाची' अशी टॅगलाईन देखील आहे. संपूर्ण कोरड्या आणि तडे गेलेल्या जमिनीवर पाण्याचे मोजकेच थेंब दिसत आहेत. त्यामुळे हा चित्रपट पाण्यावर भाष्य करणारा असू शकतो. शिवाय या पोस्टरमध्ये एका पायात बूट तर एका पायात चप्पल घातलेल्या व्यक्तीचे पाय दिसत आहे. यावरून हा सिनेमा दोन भिन्न विचार असलेल्या व्यक्तींवर आधारित असावा असेही वाटते. मिलिंद पाटील दिग्दर्शित 'H2O' या चित्रपटाची निर्मिती सुनिल म. झवर यांनी केली असून जी. एस. फिल्मस् निर्मित 'H2O' हा सिनेमा 12 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: H2O marathi film poster launch