शाहरुखच्या अॅक्टिंगची बायकोनंच उडवली टिंगल!पहा व्हिडीओ. Shah Rukh Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shah Rukh Khan,Gauri Khan

शाहरुखच्या अॅक्टिंगची बायकोनंच उडवली टिंगल!

गेले काही दिवस शाहरुखच्या आयुष्यातले अत्यंत वाईट दिवस होते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्याच्या २३ वर्षीय मुलाला आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीनं अटक केलं अनं तब्बल महिनाभर कोठडीत ठेवलं. तेव्हा एक बाप म्हणून शाहरुखची झालेली तगमग सर्वांसमोर या-ना त्या कारणातनं अनेकदा आलीच. किंग खान फक्त बॉलीवूडमध्ये बाहेर आपण सर्वसामान्यच याचा पुरेपूर अनुभव त्याने घेतला असेल आर्यनला जेलमधून सोडवताना. त्याच्यासारखीच किंबहुना त्याहून अधिक दयनीय अवस्था गौरी खानची आर्यनची आई म्हणून झाली असेल. आर्यन खान प्रकरणानंतर या दोघांनी लोकांना भेटणंच फक्त सोडलं नव्हतं तर सोशल मीडियावरूनही फारकत घेतली होती.

हेही वाचा: अर्रर्र...दीपिकानेच केला रणवीरचा पत्ता कट!नवरा-बायकोत नेमकं झालं काय?

गेल्या महिन्यात गौरी खाननं आपल्या इंटिरीअर बिझनेस संदर्भात फक्त पहिली पोस्ट केली होती. पण आता गौरीनं एक व्हिडीओ नवीन वर्षात पहिल्यांदा पोस्ट केलाय तो चांगलाच चर्चेत आलाय. या व्हिडीओत शाहरुख आणि गौरी खुर्चीमध्ये आरामात बसले आहेत. एक शांत संध्याकाळ दोघं एकमेकांसोबत एन्जॉय करताना दिसत आहेत. दोघांनी एकाच रंगाचे म्हणजे मरुन रंगाचे कपडे घातलेले आहेत. तेवढ्यात टी.व्हीवर कोणाची तरी एन्ट्री होते तेव्हा शाहरुख लगेच म्हणतो,''याला म्हणतात एन्ट्री''. तेव्हा त्याला डिवचल्यासारखंच गौरी बोलते,''हो,तुलाही अजुन ते जमलेलं नाही''. आता असं बोलून ज्या कोणाशी गौरीनं शाहरुखशी तुलना करत त्याच्या इतक्या वर्षाच्या अभिनय क्षेत्रातल्या कारकिर्दीला आव्हान दिलंय तो नेमका आहे तरी कोण?

आता थोडी गोष्ट इथे आम्ही स्पष्ट करतो की नेमक गौरी असं का म्हणाली. तर ही एका ब्रॅंडच्या टी.व्ही ची जाहिरात आहे. ज्यावरनं या दोघांमध्ये हे संभाषण घडलंय. आता ही वाक्य या दोघांच्या तोंडी दिली खरी लिहिणा-याने पण यातनं अनेक अर्थ निघतात नं राव. याचा अर्थ असाच होतो नं की अनेक सुपरहिट देऊनही आपल्या शाहरुखला अजुनही हवा तसा अभिनय जमला नाहीय नं. असो काहीही असलं तरी वयाच्या ५६ व्या वर्षीही हिरो साकारणं आणि पंचवीशीतल्या-तीशीतल्या हिरोईन्ससोबत रोमान्स करणं हे कुणाला जमंत का. शाहरुख आता 'पठाण' सिनेमात दीपिका पदुकोणसोबत दिसणार आहे. तसचं सलमानच्या 'टायगर ३' मध्येही त्याची पाहुण्या कलाकाराची भुमिका आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top