'पार्टीला एकत्र येता, संकटात मात्र..'; शिल्पा शेट्टीवरुन हंसल मेहता सेलिब्रिटींवर भडकले

"जर तुम्ही शिल्पा शेट्टीच्या बाजूने उभे राहत नसाल तर किमान तिला एकटं तरी सोडा"
hansal mehta, shilpa shetty
hansal mehta, shilpa shetty
Updated on

अश्लील चित्रफितनिर्मिती प्रकरणी उद्योजक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला १९ जुलै रोजी अटक झाली. राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पाला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आलं. याविरोधात तिने माध्यमांविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. तिनं आपल्याविरोधात ज्या माध्यमांनी बदनामीकारक वार्तांकन केलं आहे त्यांच्याविरोधात तक्रार केली. आता दिग्दर्शक हंसल मेहता यांनी शिल्पासाठी ट्विट केलं आहे. शिल्पाला एकटं सोडा, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. (Hansal Mehta defends Shilpa Shetty calls out celebs for not supporting her slv92)

"जर तुम्ही शिल्पा शेट्टीच्या बाजूने उभे राहत नसाल तर किमान तिला एकटं तरी सोडा आणि न्यायवस्थेला निर्णय घेऊ द्या. तिच्या खासगी आयुष्याचा सन्मान करा. हे खरंच दुर्दैव आहे की सेलिब्रिटींना त्यांच्या परिस्थितीवर सोडलं जातं आणि न्याय मिळण्यापूर्वीच त्यांना दोषी ठरवलं जातं", असं त्यांनी ट्विट केलंय. यावेळी हंसल मेहता यांनी शिल्पाच्या बाजूने न बोलणाऱ्या बॉलिवूड कलाकारांनाही फटकारलं.

hansal mehta, shilpa shetty
'हीन पातळीचा व्यक्ती', सुनिल पालच्या आरोपांवर मनोज वाजपेयीचं सडेतोड उत्तर

"चांगल्या वेळी सर्वजण मिळून पार्टी करतात आणि वाईट वेळ असेल तर सर्वजण मौन बाळगणं पसंत करतात. सत्य काहीही असलं तरी जे नुकसान व्हायचं होतं ते आधीच झालेलं आहे. हे एकप्रकारचं उदाहरण आहे. जेव्हा एखाद्या चित्रपट कलाकारावर आरोप केले जातात, तेव्हा त्यांच्या खासगी आयुष्यात डोकावण्याची, वाट्टेल ते बोलायची, त्यांच्याबद्दल मतं बनवण्याची आणि फालतू गॉसिपने बातम्या बनवण्याची घाई केली जाते. मौन बाळगण्याची ही किंमत आहे", अशा शब्दांत त्यांनी सुनावलं.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर जेव्हा अभिनेत्री रिया चक्रवर्तीला ट्रोल केलं गेलं, तेव्हासुद्धा हंसल मेहता तिच्या बाजूने उभे होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com