
Hansika Motwani: आईने हार्मोन्सचे इंजेक्शन देऊन हंसिका झाली तरुण? आरोपांवर अभिनेत्रीनी म्हणाली...
चित्रपटांमध्ये दिसण्यापूर्वी हंसिका मोटवानी एक यशस्वी बालकलाकार राहिली आहे. शाका लाका बूम बूम सारख्या मालिकेतून तिने टीव्हीवर लोकप्रियता मिळवली. यानंतर ती कोई मिल गया या चित्रपटात दिसली आणि नंतर गायब झाली.
काही वर्षांनी हंसिका चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसली. ती अचानक मोठी झाल्याने लोक आश्चर्यचकित झाले आणि तिला सर्व प्रकारचे प्रश्न विचारू लागले.
हंसिका शेवटची 2003 मध्ये आलेल्या कोई मिल गया या चित्रपटात बालकलाकार म्हणून दिसली होती. अवघ्या तीन वर्षांनंतर, वयाच्या १५ व्या वर्षी, तिने देसमुदुरूमध्ये अल्लू अर्जुनसोबत मुख्य भूमिका साकारली. तिचे बदललेले रूप पाहून अनेकांनी असा कयास बांधला की हंसिकाला लवकर वाढण्यासाठी हार्मोन्सचे इंजेक्शन दिले गेले असावे.
हंसिका मोटवानीने, तिच्या लव्ह शादी ड्रामाच्या एका एपिसोडमध्ये, तिच्या आईने तिला ग्रोथ हार्मोन्सचे इंजेक्शन देऊन मोठे केले या वृत्तावर मौन सोडले आहे. अभिनेत्री म्हणाली , 'सेलिब्रेटी असण्याची ही नकारात्मक बाजू आहे. लोकांनी सांगितले की, माझ्या आईने मला स्त्री बनवण्यासाठी हार्मोनल इंजेक्शन दिले होते.
या आरोपांवर अभिनेत्रीची आई मोना मोटवानी यांनीही दीड दशकांपूर्वी स्पष्टीकरण दिले होते. ती म्हणाली, "हे खरे असेल, तर मी टाटा, बिर्ला, कोणत्याही करोडपतीपेक्षा श्रीमंत असायला हवे. ते खरे असते तर मी म्हणाले असते, 'मी माझ्या मुलीला इंजेक्शन दिले आहे. मला आश्चर्य वाटते की हे लिहिणार्या लोकांकडे मेंदू असते का नसते? आम्ही पंजाबी लोक आहोत, आमच्या मुली 12 ते 16 वर्षांच्या वयात मोठ्या होतात".
हंसिका मोटवानीचा रिअॅलिटी शो हंसिका की लव्ह शादी ड्रामाचा प्रीमियर गेल्या शुक्रवारी डिस्ने प्लस हॉटस्टारवर झाला. हा शो गेल्या वर्षी झालेल्या अभिनेत्रीच्या लग्नावर आधारित आहे. त्यात तिच्या आणि पती सोहेल खातुरिया तसेच तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या मुलाखतींचा समावेश आहे.