लाल रंगाच्या भरजरी लेहेंग्यात सजली हंसिका,मुंडोता फोर्टमधून लग्नाचे फोटो व्हायरल Hansika Motwani Wedding | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hansika Motwani Sohael Khaturiya Wedding photos and videos

Hansika Motwani Wedding: लाल रंगाच्या भरजरी लेहेंग्यात सजली हंसिका,मुंडोता फोर्टमधून लग्नाचे फोटो व्हायरल

Hansika Motwani Wedding: बॉलावूडमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून ज्या लग्नाची चर्चा सुरू होती ते अखेर पार पडलं. अभिनेत्री हंसिका मोटवानी आपला बॉयफ्रेंड सोहेल कथूरियाशी लग्नबंधनात अडकली. ४ डिसेंबरला हंसिकानं जयपूर येथील मुंडोता फोर्टमध्ये सोहेल सोबत सात फेरे घेतले. नवरीच्या थाटात संजलेल्या हंसिकाचे लग्नातील फोटो आता समोर आले आहेत.(Khaturiya Wedding photos and videos)

हेही वाचा: Marathi Serial: स्वामी समर्थांशी तितिक्षाचं आहे खास नातं; अक्कलकोट मधला 'तो' अनुभव तुम्हालाही करेल थक्क..

आपल्या लग्नात हंसिका खूपच सुंदर दिसत होती. नखशिखांत सजलेल्या हंसिकाचा साजशृंगार पाहण्यासारखा आहे. लग्नात हंसिका मोटवानीने लाल रंगाचा लेहेंंगा परिधान केलेला आहे. या सुंदर लेहेंग्यावर हंसिकानं केलेला पारंपरिक दागिन्यांचा साज सगळ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. हंसिकाचा नवरा सोहेल कथुरियानं लग्नाच्या खास दिनी शेरवानी घातलेली आहे. दोघंही अगदी एकत्र मेड फॉर इच अदर दिसत आहेत. सोहेल आणि हंसिकाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेयत.

मीडिल पार्टेड हेअर आणि सटल मेकअप यामुळे हंसिकाचं सौंदर्य अजून खुलून आलं आहे. मांगटिका आणि नाकात नथ घालत हंसिकानं ब्राइडल लूक पूर्ण केला आहे. हातातील बांगड्यांपासून कलीरांपर्यंत सारंच थक्क करणारं आहे. लग्नाच्या आधी आठवड्याभरापासून हंसिका आणि सोहेलच्या लग्नाच्या विविध विधी सुरू होत्या.

सगळ्याच विधीं दरम्यान अभिनेत्रीनं आपला वेंडिग लूक खूपच क्लासी ठेवला होता. माताच्या चौकी दरम्यान ती अगदी सिंपल लाल रंगाच्या साडीत दिसली, प्री-वेडिंग पार्टीसाठी पांढऱ्या रंगाचा ड्रेस आणि संगीत पार्टीसाठी ब्लश पिंक कलरचा लेहेंगा घालत हंसिकानं सगळयांचे लक्ष वेधून घेतले होते.

हंसिकाच्या लग्नाला फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवार उपस्थित होता. प्री-वेडिंग पार्टी दरम्यान हंसिका मोटवानीनं हृतिक रोशन आणि कतरिना कैफच्या २०१४ मध्ये आलेल्या 'बॅंग बॅंग' सिनेमातील 'तू मेरी..' या हिट गाण्यावर ठुमके लावले. तसंच सिद्धार्थ मल्होत्रा आणि कतरिना कैफच्या 'काला चष्मा' गाण्यावरही जोरदार ताल धरला.

हंसिकानं सोहेल खतुरिया सोबतच्या लग्नाची जेव्हा घोषणा केली होती तेव्हा सगळेच चकित झाले होते. सोहेलने हंसिकाला पॅरिसमधील आयफेल टॉवरवर प्रपोज केलं होतं,ज्याचे सुंदर फोटो तिनं इन्स्टाग्राम हॅंडलवर शेअर केले होते. हे कपल एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत होतं. सोहेल हा एक व्यावसायिक आहे. तसंच,हंसिकासोबत त्याचं हे दुसरं लग्न आहे.