हॅप्पी बर्थडे काजोल !

रविवार, 5 ऑगस्ट 2018

आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे काजोल. आज 5 ऑगस्ट काजोलचा वाढदिवस. अभिनेत्री तनुजा समर्थ आणि शोमू मुखर्जी यांची मुलगी काजोलने 1992 साली बेखुदी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती शाहरुख खानच्या बाजीगर या चित्रपटाने. त्यानंतर प्यार किया तो डरना क्या, हम आपके दिल में रेहते है, कुछ कुछ होता है, करण अर्जुन, इश्क, कभी खुशी कभी गम, फना यांसारखे अनेक हिट चित्रपट तिने केले आहेत.

मुंबई- आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे काजोल. आज 5 ऑगस्ट काजोलचा वाढदिवस. अभिनेत्री तनुजा समर्थ आणि शोमू मुखर्जी यांची मुलगी काजोलने 1992 साली बेखुदी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती शाहरुख खानच्या बाजीगर या चित्रपटाने. त्यानंतर प्यार किया तो डरना क्या, हम आपके दिल में रेहते है, कुछ कुछ होता है, करण अर्जुन, इश्क, कभी खुशी कभी गम, फना यांसारखे अनेक हिट चित्रपट तिने केले आहेत.

काजोलचा जन्म 5 ऑगस्ट 1974 रोजी झाला. ही भारतीय सिने-अभिनेत्री व बॉलिवूडमधील प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक आहे. आपल्या अभिनयासाठी काजोलने आजवर 6 फिल्मफेअर पुरस्कारही जिंकले आहेत. ज्यांपैकी विक्रमी ५ पुरस्कार सर्वोत्तम अभिनेत्री ह्या श्रेणीमध्ये आहेत. 2011 साली भारत सरकारकडून काजोलला पद्मश्री पुरस्कार देऊनही गौरवण्यात आले आहे.

1995 साली आदित्य चोप्राने आपल्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ह्या चित्रपटामध्ये काजोलला आघाडीची भूमिका दिली आणि या चित्रपटाच्या तुफान यशामुळे काजोल यशाच्या व कीर्तीच्या शिखरावर पोचली. ह्यानंतरच्या काळात करण जोहरने काजोल व शाहरूख खान जोडीसोबत अनेक यशस्वी चित्रपट काढले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: happy birthday kajol