esakal | 'कालिन भैय्याची लवस्टोरी', दहावीत असतानाच पडला प्रेमात
sakal

बोलून बातमी शोधा

'कालिन भैय्याची लवस्टोरी', दहावीत असतानाच पडला प्रेमात

'कालिन भैय्याची लवस्टोरी', दहावीत असतानाच पडला प्रेमात

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमध्ये सध्याच्या घडीला त्या अभिनेत्याचा समावेश होतो. जो जेव्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये आला तेव्हा त्याच्याकडून एवढ्या मोठ्या यशाची अपेक्षा कुणी केली नव्हती. आता मात्र तो एक मोठा अभिनेता झाला आहे. त्यानं आतापर्यत वेगवेगळ्या मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. सुरुवातीला हजार रुपयांच्या मानधनात काम करणारा हा अभिनेता आता कोट्यवधी रुपयांचे मानधन घेताना दिसतो. केवळ आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळालेला अभिनेता म्हणून पंकज त्रिपाठीच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. आज त्याचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्तानं त्याच्या आयुष्यातील काही घटनांचा घेतलेला आढावा.

एक सर्वसामान्य अभिनेता ते लोकप्रिय अभिनेता यासाठी पंकजला मोठा संघर्ष करावा लागला आहे. त्यानं नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारुन प्रेक्षकांना निखळ आनंद दिला आहे. मिमी हा त्याचा काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला चित्रपट.त्यात त्यानं साकारलेली भूमिका प्रेक्षकांना कमालीची आवडली. त्यापूर्वी त्यानं अनुराग कश्यपच्या गँग्स ऑफ वासेपूरमधून केलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. सेक्रेड गेम्स मध्ये त्यानं केलेली भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली. पंकजला यासगळ्या प्रवासात त्याच्या पत्नीची मोठी मदत झाली. त्याच्या लवस्टोरी विषयी फार कमी जणांना माहिती आहे.

पंकज त्रिपाठीच्या पत्नीचं नाव मृदुला असं आहे. आपल्याला काही झालं तरी अभिनेताच व्हायचं हे स्वप्न पूर्ण होण्यात त्याच्या पत्नीचा वाटा मोठा आहे. तिची साथ आणि पाठींबा याच्या जोरावर पंकज आज बॉलीवूडमधील आघाडीचा अभिनेता झाला आहे. त्याच्या लवस्टोरीविषयी फार कमी जणांना माहिती आहे. दहावीत असतानाच तो प्रेमात पडला होता. तेव्हापासून त्याच्या लवस्टोरीनं आकार घ्यायला सुरुवात केली. शेवटी तो मृदुलाशी विवाहबद्धही झाला. त्यानं अनेकदा या गोष्टीचा आपल्या मुलाखतीत उल्लेखही केला होता. तो म्हणतो, आज मी जे काही आहे त्याचे सारे श्रेय मी माझ्या पत्नीला देतो.

त्या दोघांची लवस्टोरी जर आपण ऐकली तर ती आपल्याला ९० च्या दशकांतील एका चित्रपटाची वाटेल. दहावीत असताना पहिल्यांदा मृदुलाला पाहिलं. तेव्हाच तिच्या प्रेमात पडलो. आपल्याला या मुलीशीच लग्न करायचं हे तेव्हाच ठरवून टाकलं होतं. अशी आठवणही पंकजनं यावेळी त्या मुलाखतीतून सांगितली होती. एकमेकांना पत्र पाठवून त्यांच्यातील लवस्टोरी आकाराला आली होती. जेव्हा पंकज शिक्षणाच्या निमित्तानं दिल्लीला आला तेव्हा त्याला वाटलं मृदुलानं लग्न केलं असेल. मात्र तिनं त्याची प्रतिक्षा केली. त्याच्या लग्नावरुन काही काळ कुटूंबामध्ये वाद होता. मात्र कालांतरानं तो वाद मावळल्याचेही पंकजनं सांगितलं होतं.

loading image
go to top