esakal | 'तिचं ते एक वाक्य, पुढे आयुष्यभर सिगारेट सोडली'...
sakal

बोलून बातमी शोधा

rushi kapoor.

'तिचं ते एक वाक्य, पुढे आयुष्यभर सिगारेट सोडली'...

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - आपल्या अभिनयानं बॉलीवूडमध्ये अमीट ठसा उमटविणारे कलाकार म्हणून अभिनेते ऋषी कपूर यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. लहान वयातच त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. निरागस चेहरा, त्या चेहऱ्यावरील लोभसवाणं हास्य, यामुळे त्यांचा प्रभाव चाहत्यांवर कायम राहिला. त्यांनी आपल्या अभियनयानं प्रेक्षकांना जिंकून घेतले होते. आज ऋषी कपूर यांचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्तानं त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ३० एप्रिल २०२० रोजी त्याचं निधन झालं. त्यांच्या निमित्तानं बॉलीवूडनं मोठा स्टार गमावला होता. त्यांचं जाणं चाहत्यांच्या मनाला चटका लावून जाणारं होतं. आजही ऋषी कपूर यांचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यांच्या चित्रपट आणि गाण्यांवर प्रेम करणाऱ्या चाहत्यांमध्ये तरुणाईची संख्या मोठी आहे.

ऋषी कपूर यांना सिगारेट ओढण्याची सवय होती. ही वाईट सवय सोडावी म्हणून त्यांनी अनेक प्रयत्न केले. मात्र हे व्यसन काही सहजासहजी सुटत नव्हते. योगायोगानं त्यांच्याबाबत एक घटना घडली. त्यामुळे त्यांनी सिगारेट सोडली. ती शेवटपर्यत. अनेक मुलाखतींतून त्यांनी ही गोष्ट सांगितली होती. त्या प्रसंगानं त्यांना बदलून टाकलं होतं. काय होता तो प्रसंग, आपणही तो जाणून घेऊयात. तो काळ असा होता की, प्रत्येक निर्माता आणि दिग्दर्शकाला त्यांच्या चित्रपटात ऋषी कपूर नावाचा कलाकार हवा होता. त्यावेळी ते स्टार होते. त्यांचा स्टारडम मोठा होता. यामुळे त्यांच्या नावाला मोठं वलय प्राप्त झालं होतं. दरम्यान ऋषी कपूर यांच्या सिगारेट पिण्याविषयीच्या बातम्याही प्रसिद्ध होत्या. त्यावेळच्या काही मासिकांमध्ये त्या छापूनही आल्या होत्या.

ऋषी कपूर यांची खुल्लम खुल्ला नावाची फिल्म तेव्हा फार चर्चेत होती. त्याला मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची पसंतीही मिळाली होती. या चित्रपटांनं बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणावर यश मिळवलं. ऋषी कपूर यांच्या मुलीला म्हणजे रिद्धीमाला ते सिगारेट पितात हे आवडत नव्हतं. तिनं वडिलांना सांगितलं, तुम्ही सिगारेट ओढता हे काही चांगल नाही, त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची दुर्गंधी येते. याचा सगळ्यांनाच त्रास होतो. यानंतर मात्र पुन्हा ऋषी कपूर यांनी सिगारेटला हात लावला नाही.

loading image
go to top