
बर्थडेनिमित्त भन्साळींच्या मुंबईमधील ऑफिसमध्ये पार्टी ठेवण्यात आली होती. अनेक सेलिब्रेटींनी या पार्टीला हजेरी लावली होती.
मुंबई - बॉलिवूडमधील प्रसिध्द दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांनी आपल्या हटके चित्रपटांने हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. मोठे सेट,उत्तम पार्श्वसंगित,कलाकारांचे पोषाख या सगळ्यांवर विषेश लक्ष देऊन भन्साळी त्यांच्या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मीती करतात. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. बुधवारी 24 फेब्रुवारीला भन्साळींनी 58 वा वाढदिवस साजरा केला. बर्थडेनिमित्त भन्साळींच्या मुंबईमधील ऑफिसमध्ये पार्टी ठेवण्यात आली होती. अनेक सेलिब्रेटींनी या पार्टीला हजेरी लावली होती.
संजय भन्साळींच्या बर्थडेनिमित्त त्यांच्या 'गंगूबाई काठीयावाडी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. गंगूबाई काठीयावाडी चित्रपटातील प्रमुख भूमिका करणारी आलिया भटसुद्धा या पार्टीला आली होती.
मिडीयासाठी आलियाने 'गंगूबाई स्टईल' मध्ये पोज दिली. हंगामा २ चित्रपटातील अभिनेत्री मिझानने सोशल मीडियावर पार्टीचे फोटो शेअर केलाय.
पाहा VIDEO - "..और ये हमारी पावती कट गई है"; विवेक ओबेरॉयचा व्हिडीओ व्हायरल
पार्टीमधील एका व्हिडीओसुद्धा व्हायरल होत असून त्यामध्ये संजय लिला भन्साळी 'मेसी केक' पूल अप करताना दिसले. तर आलियाने हॅप्पी बर्थ डे गाणे म्हणून भन्साळींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. व्हिडीओमध्ये चित्रपट निर्माती शबिना खान पार्टी एन्जॉय करताना दिसत आहे.
हे वाचा - Big Boss 14 - रुबिना, राहुलची हाऊस पार्टी; 'पावरी' व्हिडीओ केला शेअर
आलियाने पार्टीसाठी केलेल्या कूल लूकची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. व्हाईट वन साईड ऑफ शोल्डर ड्रेस, रिंग शेप ईयर रिंग, हिल्स असा कूल स्टायलिश लूक आलियाने केला होता. संजय लिला भन्साळी दिग्दर्शित 'गंगूबाई काठीयावाडी' हा चित्रपट 30 जुलै 2021 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.