"..और ये हमारी पावती कट गई है"; विवेक ओबेरॉयचा व्हिडीओ व्हायरल

vivek oberoi
vivek oberoi

अभिनेता विवेक ओबेरॉयवर विना हेल्मेट दुचाकी चालवल्याने मुंबई पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. विवेकचा दुचाकी चालवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर वाहतून नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली. यानंतर आता विवेकचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विवेकने 'पावरी' ट्रेंडमध्ये उडी घेतली असून मुंबई पोलिसांना उद्देशून त्याने हा व्हिडीओ शूट केला आहे. 

'ये हम है, ये हमाई बाईक्स है और ये हमारी पावती कट गई है', असं तो व्हिडीओत म्हणतोय. यासोबतच त्याने दंडात्मक कारवाईची पावती या व्हिडीओत दाखवली आहे. 'मुंबई पोलीस हे तुमच्यासाठी आहे', असं त्याने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय. याचसोबत त्याने हॅशटॅगमध्ये हेल्मेट घालण्याचं आवाहन केलं आहे. 

काय आहे प्रकरण?
हेल्मेट व मास्क न घातल्याने सांताक्रूझ वाहतूक पोलिसांनी पाचशे रुपये दंडाचे ई चलान विवेकला पाठवलं होतं. सामान्य नागरिक सेलिब्रिटींना फॉलो करतात आणि त्यांचं अनुकरण करू पाहतात. जर सेलिब्रिटींनीच काळजी घेतली नाही तर सर्वसामान्यांमध्येही त्याचा चुकीचा संदेश जातो, यामुळे विवेकवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं होतं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vivek Oberoi (@vivekoberoi)

काय आहे 'पावरी' ट्रेंड?
सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. यामध्ये ती तरुणी म्हणते, "ये हम है, ये हमारी कार है और ये हमारी पावरी हो रही है". ती तरुणी पार्टी या शब्दाचा उच्चार ज्या प्रकारे करते, ते पाहून नेटकऱ्यांना हसू आवरलं नाही. अनेकांनी त्यावर मीम्स तयार केले तर तिचं अनुकरण करत नेटकऱ्यांनी विविध व्हिडीओसुद्धा पोस्ट केले. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना या ट्रेंडने भुरळ घातली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com