esakal | ऐश्वर्यासाठी सलमानशी पंगा, नंतर मंत्र्याच्या मुलीशीच लग्न
sakal

बोलून बातमी शोधा

ऐश्वर्यासाठी सलमानशी पंगा, नंतर मंत्र्याच्या मुलीशीच लग्न

ऐश्वर्यासाठी सलमानशी पंगा, नंतर मंत्र्याच्या मुलीशीच लग्न

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - आपल्या हटके स्टाईल आणि अभिनयानं त्या अभिनेत्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. पहिल्यांदा तो राम गोपाल वर्माच्या कंपनी नावाच्या चित्रपटामध्ये दिसला होता. त्यात त्यानं अजय देवगणसोबत काम केलं होतं. त्यानंतर पुढे मणिरत्नम यांच्या साथीया मधून त्याला मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळाली. पुढे त्याचा प्रवास जोरात सुरु झाला. अशा विवेक ऑबेरॉयचा आज जन्मदिवस आहे. त्याच्याविषयीच्या अनेक गोष्टी बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध आहेत. त्याची प्रेमप्रकरणं, त्याची बॉलीवूडच्या भाईजानशी झालेली भांडणं, त्यानंतर त्याला बॉलीवूडपासून लांब जावं लागणं, यामुळे तो काही काळ नैराश्यातही होता. आपल्याला जाणीवपूर्वक काम दिलं जात नसल्याची त्यानं खंतही व्यक्त केली होती. आपण त्याच्या बॉलीवुडच्या प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत.

आज बॉलीवुडचा प्रख्यात अभिनेता विवेक ऑबेरॉयचा जन्मदिवस आहे. तो सध्याच्या घडीला मोठा बॉलीवूड सेलिब्रेटी आहे. त्यानं काही वर्षांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पदार्पण केल्याचे दिसून आले आहे. त्यातील त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळाली होती. विवेकची चर्चा तेव्हा सुरु झाली होती जेव्हा त्यानं सलमान खानशी पंगा घेतला होता. त्यावेळी या दोघांमधील भांडण हा बॉलीवूडमधील सर्वात चर्चिला जाणारा विषय होता. आजही या दोघांच्या चाहत्यांसाठी तो वादाचा मुद्दा ठरताना दिसतो. यासगळ्यामागे कारणं होतं. प्रख्यात अभिनेत्री आणि विश्वसुंदरी ऐश्वर्या रॉय. तिचं आणि सलमान खानचं प्रेमप्रकरणं तेव्हा चर्चेत होतं. मात्र सलमानच्या तऱ्हेवाईक वागण्याला ती कंटाळली होती. आणि तिनं विवेकशी मैत्री केली होती.

सलमानला जेव्हा या प्रकरणाविषयी समजलं तेव्हा त्यानं थेट विवेकशी भांडण केली. त्यांच्यातील वाद फार टोकाला गेला होता हेही सर्वांना ठाऊक होतं. विवेकनं सलमानच्या गर्लफ्रेंडलाच डेट करण्यास सुरुवात केल्यानं तो विवेकवर चिडून होता. त्यामुळे पुढे कित्येक काळ त्यांच्यातील भांडणं ही चाहत्यांसाठी चर्चेचा विषय होऊन बसली. विवेक हा बॉलीवूडमधील प्रख्यात अभिनेते सुरेश ऑबेरॉय यांचा मुलगा आहे. त्यानं आपल्या करिअरची सुरुवात राम गोपाल वर्मा यांच्या कंपनीतून पदार्पण केलं होतं. त्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ठ अभिनयाचं पारितोषिकही मिळालं होतं.

विवेकनं जेव्हा सलमानशी पंगा घेतला त्यानंतर त्याचं नाव कुण्या दुसऱ्या अभिनेत्रीबरोबर जोडलं गेलं नव्हतं. त्यानं ऐश्वर्याशी ब्रेक अप केलं आणि तो काही वर्षांसाठी बॉलीवूडमधून गायब झाला होता. त्यानं २०१० मध्ये कर्नाटकचे माजी मंत्री जीवराज अल्वा यांची मुलगी प्रियंकाशी लग्न केलं. त्या दोघांचीही लवस्टोरी ही प्रसिद्ध आहे.

loading image
go to top