
Subodh Bhave: मनोरंजन सृष्टीत जेव्हा एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री एकमेकांना खास ठिकाणी भेटतात,तेव्हा त्या भेटीमागे नेमकं काय कारण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. त्यात जर का मराठी इंडस्ट्रीतला अभिनेता थेट साऊथ अभिनेत्याला भेटला तर चर्चा ही रंगणारच नाही का...हजार प्रश्न मनात येणं स्वाभाविक.म्हणून नागार्जुनला थेट हैदराबादमध्ये जाऊन सुबोध भावे भेटला याची चर्चाही तितकीच रंगली. (Har Har Mahadev Actor Subodh Bhave meet South Superstar Nagarjun in hyderabad)
अर्थात याचं कारण खूपच छान आहे जे सुबोधनं सोशल मीडियावर आपल्या पोस्टच्या माध्यमातून व्यक्त होत सांगितलं आहे. अजूनही आपणास कदाचित वाटत असेल सुबोध साऊथमध्ये चालला की नागार्जुन मराठीत येतोय. आता कलाकारांची देवाणघेवाण जरा जास्तच होत आहे सगळ्याच इंडस्ट्रीत, बॉलीवूडकर चाललेच आहेत साऊथमध्ये, मग मराठी कलाकार गेले तर नवल कशाला. सध्या काहीही घडू शकतं. चला तर मग जाणून घेऊया सुबोध-नागार्जुन भेटीमागचं कारण...
आता आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे सुबोध भावे सध्या त्याच्या 'हर हर महादेव' सिनेमाच्या प्रमोशन मध्ये बिझी आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर हा सिनेमा आपल्या भेटीस येत आहे. या सिनेमात सुबोध छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. तर त्याच्यासोबत बाजीप्रभू देशपांडे यांची व्यक्तिरेखा अभिनेता शरद केळकर साकारत आहे. सध्या या सिनेमाचा बोलबाला सर्वत्र होत आहे. अर्थात छत्रपती शिवाजी महाराज हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे म्हणून हे घडतंय हे एक कारण, पण दुसरं कारण आहे ते म्हणजे हा सिनेमा एकाच वेळेस अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे. ज्यात दाक्षिणात्य भाषांचा देखील समावेश आहे. आणि म्हणूनच साऊथ स्टार नागार्जुनही या सिनेमाशी नकळत जोडला गेला आहे.
सुबोध भावेनं हैदराबादमध्ये जाऊन हर हर महादेवच्या सिनेमाच्या प्रमोशन संदर्भातच नागार्जुन यांची भेट घेतली. आणि त्यानं पोस्ट करत त्या भेटीचं सविस्तर वर्णनही केलं. सुबोध आपल्या पोस्टमध्ये म्हणाला आहे,''आज "हर हर महादेव " चित्रपट सर्वदूर पोहोचवण्याच्या निमित्ताने, हैद्राबाद येथे तेलगू सुपरस्टार नागार्जुन सर यांची भेट घेतली.
त्यांच्या हस्ते चित्रपटाचं तेलगू भाषेतील पोस्टर प्रकाशित करण्यात आलं.
समस्त तेलगू बंधू भगिनींना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर आधारित हा चित्रपट पाहण्यासाठी आणि शिव विचार जाणून घेण्याचे आवाहन केले.
ते स्वतः छत्रपतींच्या चरीत्राने प्रभावित झाल्याचं त्यांनी सांगितलं.
"हर हर महादेव" च्या संपूर्ण संघाच्या वतीने आम्ही त्यांना सिंहासनारूढ शिवछत्रपतींची मूर्ती भेट म्हणून दिली.
मराठी चित्रपट सर्वदूर नेण्याच्या प्रयत्नाला त्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या व लवकरच "हर हर महादेव" चित्रपट तेलगू भाषेत पाहणार असल्याचं सांगितलं.
नागार्जुन सर आपले आमच्या तमाम शिव - भक्तांतर्फे मनापासून आभार मानतो''
हर हर महादेव .
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.