हरभजन सिंगच्या नव्या टॅटूनं वेधलं लक्ष; हातावर गोंदवलं निळकंठाचं रुप | Harbhajan Singh New Tatto | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Harbhajan Singh New Tatto

हरभजन सिंगच्या नव्या टॅटूनं वेधलं लक्ष; हातावर गोंदवलं निळकंठाचं रुप

भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंग (Harbhajan Singh) सध्या क्रिकेट(Cricket)मुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. त्याचं टॅटूप्रेम सर्वपरिचित आहे. पण तरिही नुकताच त्यानं आपल्या हातावर जो टॅटू गोंदवला आहे त्याची भलतीच चर्चा होऊ लागलीय. हरभजननं आपल्या हातावर महाशिवरात्री निमित्तानं भगवान शंकराचा टॅटू काढला आहे. हा टॅटू आपल्या हातावर गोंदवून घेण्यासाठी म्हणे हरभजन एका जागेवर तब्बल सहा तास बसला होता. त्यानं टॅटू गोंदवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत त्याबद्दल माहिती दिली आहे. त्यानं तो व्हिडीओ पोस्ट करीत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की,''ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।उर्वारुकमिव बन्धनान मृत्योर्मुक्षीय मामृतात।। शिव सत्य है, शिव अनंत है, शिव अनादि है, शिव भगवंत है,शिव ओंकार है, शिव ब्रह्म हैं,शिव शक्ति है, शिव भक्ति है...महाशिवरात्रि की हार्दिक शुभकामनाएं।'' हरभजनच्या या पोस्टला पाहून त्याचे चाहते मात्र भलतेच खूश झाले आहेत.

हरभजन लवकरच आपल्याला दोन तामिळ सिनेमात अभिनय करताना दिसणार आहे. यातील एक सिनेमा आहे, सायन्स फिक्शन कॉमैडीपट तर दुसरा रोमॅंटिक स्पोर्ट्स कॉमेडी. हरभजननं गेल्याच महिन्यात या दोन्ही सिनेमांचे शुटिंग पूर्ण केले आहे. हरभजन या सिनेमातील आपल्या भूमिकेविषयी खूपच उत्सुक आहे. हरभजनची ही सिनेइंडस्ट्रीतली जर्नी त्याच्या क्रिकेटजगतातील जर्नीप्रमाणेच रोमहर्षक ठरेल या आशा.

हरभजननं नेहमीच क्रिकेटच्या मैदानावर आपलं अस्तित्व समोरच्या फलंदाजाला चांगलंच दाखवलं आहे. त्याच्या गोलंदाजीनं अनेकांच्या दांड्या गुल केलेल्या आपण पाहिल्या आहेत. त्याच्या खेळाइतकाच मैदानावरचा त्याचा अॅटिट्युड सगळ्यांना आवडायचा. आता सिनेमातनं तो किती कमाल दाखवतोय हे लवकरच कळेल.