esakal | "अनिल कपूरचा मुलगा म्हणून माझा द्वेष करतात"; हर्षवर्धनची खंत
sakal

बोलून बातमी शोधा

Harsh Varrdhan Kapoor, Anil Kapoor

"अनिल कपूरचा मुलगा म्हणून माझा द्वेष करतात"; हर्षवर्धनची खंत

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडमधील 'एव्हर ग्रीन कलाकार' म्हणून ओळखले जाणारे अभिनेता अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूरने 'मिर्झिया' या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर हर्षवर्धनने 'भावेश जोशी सुपरहीरो' या चित्रपटामध्ये काम केले. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'स्पॉट लाईट' या 'रे' सीरिजमधील शॉर्ट फिल्ममध्ये हर्षवर्धनने प्रमुख भूमिका साकारली. आर जे सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीमध्ये हर्षवर्धनने अनिल कपूर यांचा मुलगा म्हणून त्याला मिळणाऱ्या वागणुकीबद्दल सांगितले. (Harsh Varrdhan Kapoor says he is hated by people because he is Anil Kapoor son)

मुलाखतीमध्ये हर्षवर्धन म्हणाला, "नेहमीचे बॉलिवूडमधील टिपिकल चित्रपट न करता मी वेगळे चित्रपट करण्याचा निर्णय घेतला आहे. मी मीडियामध्ये जास्त सक्रिय नसतो. मी माझ्या आवडत्या गोष्टी करतो. माझ्यासोबत काम करण्याऱ्या बऱ्याच लोकांना माहित आहे मी कसा आहे. त्यामुळे माझा तिरस्कार करणारे लोक कमी आहेत. मी कितीही चांगले काम केले किंवा मी कितीही चित्रपट करत असलो, तरी काही लोक असे आहेत जे माझा द्वेष करतात. अनिल कपूर यांचा मुलगा आहे म्हणून ते माझा द्वेष करतात'

हेही वाचा: 'थोडीतरी माणूसकी जपूया'; दिलीप कुमार यांच्या अंत्यविधीनंतर क्रितीची विनंती

हेही वाचा: 'कमेंट सेक्शन बंद कर नाहीतर..'; आमिरच्या घटस्फोटानंतर चाहत्यांचा फातिमाला सल्ला

हर्षवर्धनने पुढे सांगितले की, "मी अनिल कपूर यांचा मुलगा आहे म्हणून माझा द्वेष करणाऱ्या लोकांचं मी काही करू शकत नाही'. हर्षवर्धन लकरच अनिल कपूर यांच्यासोबत भारतीय नेमबाज अभिनव बिंद्रा यांच्या बायोपिकमध्ये काम करणार आहे. एका मुलाखतीमध्ये हर्षवर्धनने स्वत:बद्दल सांगितले की, तो खूप बोरिंग (boring) माणूस आहे, त्याला गर्लफ्रेंड सुद्धा नाही. पुढे तो म्हणाला की, 'मला असे वाटत नाही की मी दररोज जीम लूक करू शकतो. जर मी तसे केले तर मी वेडा होईन आणि पळून जाईन. मला फक्त चित्रपटांमध्ये काम करायला आवडते. या बाकीच्या गोष्टी करणे मी टाळतो.'

loading image