...काय आहे दाऊदच्या बहिणीची कहाणी?

वृंदा चांदोरकर
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

अभिनेत्री श्रद्धा कपूरने सोमवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवर आगामी 'हसीना' चित्रपटाचे पोस्टर ट्विट केले आहे. 'हसीना' हा बायोपिक आहे. पण कोण होती ही हसिना..? 

चित्रपटाचे नाव 'हसीना' असले तरी हा कोणत्या सौंदर्यवतीवर बेतलेला चित्रपट नाही. दाऊद इब्राहिम या कुख्यात गुंडाची बहिण 'हसीना इब्राहिम पारकर' हिच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट आहे. 

अभिनेत्री श्रद्धा कपूरने सोमवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवर आगामी 'हसीना' चित्रपटाचे पोस्टर ट्विट केले आहे. 'हसीना' हा बायोपिक आहे. पण कोण होती ही हसिना..? 

चित्रपटाचे नाव 'हसीना' असले तरी हा कोणत्या सौंदर्यवतीवर बेतलेला चित्रपट नाही. दाऊद इब्राहिम या कुख्यात गुंडाची बहिण 'हसीना इब्राहिम पारकर' हिच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट आहे. 

नाहिद खानची निर्मिती असलेला 'हसीना - द क्विन ऑफ मुंबई' हा चित्रपट अपूर्व लाखिया दिग्दर्शित करणार आहे. ऑक्टोबर 2016 मध्ये या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली असून, श्रद्धा कपूरने ट्विट केलेल्या पोस्टवरुन आपल्याला चित्रपटाचा फर्स्ट लूकची कल्पना येईल..

हसीना इब्राहिम पारकर
अंडरवर्ल्डच्या दुनियेत हसीना पारकर 'अंडरवर्ल्ड क्वीन' नाहीतर 'हसीना आपा' नावाने ओळखली जात असे. मुलगा अलीशाह आणि आपल्या मुलीबरोबर नागपाडा येथील 'गार्डन हाऊस' नावाच्या इमारतीमध्ये तीचे वास्तव्य होते. विशेष म्हणजे या इमारतीच्या समोरच पोलिस ठाणे आहे. 1991 मध्ये तीचा नवरा इब्राहिम पारकर याची हत्या करण्यात आली होती. तिच्यावर पोलिसांनी एकदा फिर्याद दाखल केली होती, परंतु, त्यावेळी पतिच्या निधनानंतर आपला दाऊदशी कोणताही संबध नसल्याचे तिने न्यायालयात म्हटले होते. 2006 मध्ये हसीनाचा मोठा मुलगा दानिशचा एका मोटार अपघातात मृत्यू झाला. 

दाऊदने भारत सोडल्यानंतर त्याच्या मालमत्तेसह इतर सर्व जबाबदारी हसीना बघत असल्याचे बोलले जात होते. मोठमोठाल्या बिल्डर्सकडून कमिशन हसीना घेते आणि ती दाऊदच्याही नियमित संपर्कात असल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. अनेकवेळा दुबई आणि पाकिस्तानात तिच्या दाऊदबरोबर भेटी झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. 

हसीना पारकरचे 2014 मध्ये वयाच्या 51 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यावेळी तिच्या निवासस्थानाबाहेर मोठ्याप्रमाणावर पोलिसांचा पहारा होता. अंत्यदर्शनासाठी दाऊद भारतात येण्याची शक्यता त्यावेळी वर्तविली जात होती. परंतु, पोलिसांना याबाबत कोणतीही माहिती मिळाली नव्हती. 

हसीना इब्राहिम पारकर चित्रपट

  • निर्माते - नाहिद खान
  • दिग्दर्शक - अपूर्व लाखिया
  • हसिना पार्कर (मुख्य भूमिका) - श्रद्धा कपूर
  • दाऊद ईब्राहिम (सहय्यक भूमिका) - सिद्धांत कपूर
  • ईब्राहिम पार्कर (सहय्यक भूमिका) - अंकूर भाटिया
  • पोलिस ऑफिसर (सहय्यक भूमिका) - शरमन जोश
Web Title: haseena the queen of mumbai