esakal | अनुष्काचा हा हटके व्हिडिओ पाहिला का?
sakal

बोलून बातमी शोधा

Anushka sharma's  cop look for new ad

एका पोलिस ऑफिसरच्या भुमिेकेत अनुषअका शर्माची अॅड नुकतीच प्रदर्शित झाली. पोलिसांच्या वर्दीतल्या अनुष्काचा लुक एकदम हटके आहे. 

अनुष्काचा हा हटके व्हिडिओ पाहिला का?

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सतत वेगवेगळ्या भुमिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला येते. ती पार पडत असलेल्या प्रत्येक रोलमध्ये तिची एक वेगळी छबी दिसून येते.  याच कारणाने ती वेगवेगळ्या भुमिकांमध्ये प्रयोग करते. अनुष्का 2018 मध्ये 'जीरो ' या चित्रपटातून दिसली होती. त्य़ानंतर मात्र तीचा कोणताही सिनेमा प्रदर्शित झाला नाही. पण याची कसर तीने पूर्णपणे भरुन काढली आहे. एका पोलिस ऑफिसरच्या भुमिेकेत तीची अॅड नुकतीच प्रदर्शित झाली. पोलिसांच्या वर्दीतल्या अनुष्काचा लुक एकदम हटके आहे. 

हा तीचा दमदार लुक एका अॅडसाठी होता ज्याचा पूर्ण व्हिडीओ अनुष्काने इंस्टाग्रामच्या माध्यमातून अपलोड केला आहे. यामध्ये अनुष्का एका घरावर छापा मारताना दिसते आणि चौकशीसाठी तपास घेण्यास सुरुवात करते. तपास घेत ती थेट बाथरुमपर्यंत पोहोचते. बाथरुम पाहून ती एक्साईट आणि अचानक नाचायला सुरुवात करते. तिथे उपस्थित असलेली घरातली मंडशी आश्चर्यचकीत होतात. मात्र त्यानंतर अनुष्का निघून जाते. ही अॅड अतिशय मजेशीर आहे. तीच्या या लुकची इंटरनेटवर खूप चर्चा आहे.

अनुष्का शर्मा सध्या आणखी एका कारणाने चर्चेमध्ये आहे.बॉलिवूड अभिनेत्री झरीन खान हिने इंस्टाग्रामवर टाकलेल्या फोटोमध्ये तीच्या पोटावरील स्ट्रेच मार्क दिसत आहेत. याच कारणावरुन नेटकऱ्यांनी तीला ट्रोल केलं. मात्र अनुष्का शर्माने तिला पाठिंबा देत, इंस्टाग्राम स्टोरी टाकत तिचं कौतुक केलं आहे. 

loading image
go to top