जॅमी लिव्हरच्या मिमिक्रीवर फराहची हसून पुरती वाट;पहा व्हिडीओ Farah Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jamie Lever & Farah Khan

जॅमी लिव्हरच्या मिमिक्रीवर फराहची हसून पुरती वाट;पहा व्हिडीओ

'कपिल शर्मा शो' हा एक फॅमिली एंटरटेनर शो आहे. इथे मोठमोठ्या सिनेमांच्या प्रमोशनसाठी अनेक कलाकार येत असतात. तेव्हा त्यांच्यासोबत इंटरॅक्शन करताना शो मधील कलाकारांकडून अनेक विनोदी प्रसंग सादर केले जातात,कधी आलेल्या कलाकारांनाच विनोदी शैलीतून टार्गेट केले जाते. ब-याचदा अक्षय कुमारसारखा स्मार्ट अॅक्टर जेव्हा येतो तेव्हा मात्र शो मधील विनोदी मातब्बरांनाही त्याच्यापुढे नांगी टाकावी लागते. असो,शो चा टीआरपी मात्र जोरात आहे. आता नुकतीच या शो मध्ये विनोदी कलाकार म्हणून वर्णी लागली आहे ती प्रसिद्ध अभिनेता जॉनी लिव्हर यांची मुलगी जॅमी लिव्हरची(Jamie Lever). जॅमी खूप चांगल्याप्रकारे एखाद्याची मिमिक्री करू शकते.

हेही वाचा: 'पुष्पा'च्या प्रेमात स्पायडरमॅन; थिरकला 'सामी सामी' गाण्यावर...

जॅमी लिव्हर जेव्हापासनं शो चा भाग बनली आहे तेव्हापासूनच्या भागांमध्ये फराह आणि जॅमी दोन वेळा आमने सामने आल्या आहेत. तेव्हा जॅमी ने फराहची मिमिक्री केली होती. आणि पहिल्यावेळेस फराहला ते पाहून खूपच ओशाळल्यागत झालं होतं. कारण फराहच्या टिपिकल बोलण्याच्या स्टाईलवर नेमंक जॅमीनं विनोदाचं बोट ठेवलं होतं. त्यामुळे आताच्या भागात रविना टंडनसोबत उपस्थिती दर्शवलेल्या फराहने स्टेजवर जॅमीनं जेव्हा एकेकाची मिमिक्री करायला घेतली तेव्हा फराहनं हातानेच तिला कंट्रोलमध्ये राहण्याचा इशारा दिला. जॅमीनंही कान पकडत आपण आधीसारखं जास्त काही बोलणार नाही याची हावभावातूनच शाश्वती दिली. तिनं जॅमीला स्वतःची मिमिक्री करण्यास सांगितलं खरं पण हिशोबात राहून कर असा जो हातवारे करून सल्ला दिला तो मात्र कॅमे-यातून सुटू शकला नाही. जॅमीनंही मग वरवर तिची मिमिक्री केली पण फार काही तिच्यावर मिमिक्रीच्या माध्यमातून भाष्य करणं टाळलं .

लंडनमध्ये शिकलेल्या जॅमीला अभिनयाचं क्षेत्र खुणावू लागलं अन् लंडनमधील चांगली नोकरी सोडून ती मुंबईत आली. वडिलांमधील विनोदाचा अंग तिच्यातही होताच त्यामुळे तिनं मुंबईत अनेक स्टॅंडअप कॉमेडी शो केलेले आहेत. तिनं स्वतःची ओळख निर्माण करून मग बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली. तिला कंगना रणौतची मिमिक्री उत्तम जमते. गाणं हे तिचं पहिलं प्रेम आहे. म्हणूनच आपल्या कुठल्याही स्टॅंडअप कॉमेडी शो मध्ये ती शेवटी एक गाणं गातेच. आता 'कपिल शर्मा शो' मध्ये तिची एन्ट्री नुकतीच झालीय. फराहने जरी तिला मिमिक्री करण्यावरनं टोकलं असलं तरी जॅमीकडे विनोदाचं उत्तम टायमिंग आहे आणि कधी-कुठे-काय बोलायच विनोद करताना याची उत्तम जाण आहे म्हणूनच तर फराह खानने(Farah Khan) टोकल्यावर तिनं असा काही डायलॉग मारला की फराह सुद्धा लोटपोट होऊन हसू लागली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top