'पुष्पा'च्या प्रेमात स्पायडरमॅन; थिरकला 'सामी सामी' गाण्यावर... Allu arjun | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Allu Arjun,Rashmika Mandana & SPiderman

'पुष्पा'च्या प्रेमात स्पायडरमॅन; थिरकला 'सामी सामी' गाण्यावर...

अल्लु अर्जुन(Allu Arjun) अन् रश्मिका मंदानाच्या(Rashmika Mandana) 'पुष्पा' सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. आज चार आठवडे सिनेमाला प्रदर्शित होऊन झाले तरी चाहत्यांच्या डोक्यातनं 'पुष्पा' फीव्हर काही कमी व्हायचं नाव घेत नाही. खरंतर सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच या सिनेमातील गाण्यांनी लोकांना वेड लावलं होतं. सिनेमाचे संगीतकार देवी श्रीप्रसाद यांना याचं पूर्ण क्रेडिट नक्कीच द्यावं लागेल. सोशल मीडियावर या सिनेमाच्या डायलॉगसोबतच त्यातील गाण्यांचे रीलही इतके व्हायरल झाले की जिकडे तिकडे 'सामी सामी' ऐकायला येऊ लागले. इतकंच काय सिनेमाची हिरोईन रश्मिका मंदानानंही सोशल मीडियावर 'सामी सामी' गाण्याची व्हिडीओ रील शेअर केली होती. ज्याला लाखोंनी व्ह्युज मिळाले.

आता 'सामी सामी' गाण्यावर डान्स केल्याचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या गाण्यात एका चाहत्यानं चक्क 'स्पायडरमॅन' चा पेहराव केला आहे. आणि तो 'पुष्पा' सिनेमातील 'सामी सामी' गाण्यावर डान्स करतोय. त्याच्यासमोर सांताक्लॉजचा पेहराव करून चार-पाच चाहतेही या गाण्याच्या तालावर ठेका धरलेले दिसून येत आहेत. या व्हिडीओला अल्लु अर्जुचा भाऊ अल्लू शिरीषनं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहे. त्यानं या व्हिडीओला शेअर करताना केलेल्या ट्वीट मध्ये म्हटलंय,''अल्लू अर्जून आणि स्पायडरच्या चाहत्यांसाठी हा व्हिडीओ विशेष मेजवानी ठरेल. त्यानं स्पायडरमॅनचे आभार मानत 'ये इंडिया है बॉस' असं लिहिलं आहे. अर्थात हे असं सिनेमाप्रेम भारतातच पहायला मिळेल असं अल्लू शिरीषला म्हणायचं असेल बहुधा. '' Spiderman celebrating his success dancing to "Rara Saami" from Pushpa! As a fan of AA & Spidey.. Waah! Yeh India hain boss. @SpiderMan अल्लू शिरीषने हे ट्वीट केले आहे.

Web Title: Omg Spider Man Joins Pushpa Craze Dances To Allu Arjun Rashmika Mandannas Saami Saami Song Watch Video Entertainment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top