esakal | गहना वशिष्ठ हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण
sakal

बोलून बातमी शोधा

gehana vasisth

गहना वशिष्ठ हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण

sakal_logo
By
सुधीर काकडे

मुंबई: पोर्नोग्राफी प्रकरणात गुन्हा दाखल झालेली अभिनेत्री गहना वशिष्ठ (Gehana vasisth) हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी आज पूर्ण झाली असून मुंबई उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. ओटीटी प्लैटफौर्मवर (OTT Platform) अश्लील कंटेंट पोस्ट करणे, तक्रारदारांना धमकावून काम करवून घेणे अशा तक्रारी गहनाविरोधात दाखल झाले आहेत. त तक्रारीमध्ये गहनाला पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. मात्र पोलीस अटक करतील या शक्यतेमुळे तिने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. यावर आज न्या संदीप शिंदे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

पोलिसांना तिचा ताबा हवा आहे, तिने काही कागदपत्रांचा आणि करांरांचा उल्लेख केला आहे. त्याची माहिती घ्यायची आहे, त्यामुळे तीने पोलीस चौकशीला हजर रहावे, असे पोलिसांच्या वतीने सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी सांगितले. या प्रकरणातील अन्य तीन आरोपी अटकेत आहेत आणि गहना यामध्ये संचालक आहे. तसेच तिच्याकडे काही व्हिडीओ आढळले आहेत मात्र ते न्यायवैद्यक शाळेत पाठविले आहेत, त्यामुळे पोलिसांनी अद्याप ते तपासले नाहीत, तिच्यावर कलम ३७० चा विचार पोलीस करत आहेत, असेही सरकारी वकिलांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: पोर्नोग्राफी प्रकरण : गहना वशिष्ठचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

गहनावर पोलिसांनी भादंवि कलम ३७० का लावले नाही, असा.प्रश्न न्यायालयाने मुंबई पोलिसांना केला. एखाद्याच्या इच्छेवर त्याच्याकडून काम करून घेणे अशी तरतूद कलम ३७० मध्ये आहे. गहना विरोधात तीन एफआयआर दाखल आहेत. ओटीटी प्लैटफौर्मवर अश्लील व्हिडीओ प्रसारित केल्याचा आरोप तिच्यावर आहे. यापूर्वी दोन प्रकरणात तिला अटक झाली होती तर जामीनावर सुटल्यानंतर तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र सर्व आरोपांचे खंडन तिच्याकडून करण्यात आले आहे. तक्रारदारांनी स्वेच्छेने काम केले आणि त्यांचे व्हिडीओ आणि लेखी करार आहेत, असा दावा तिचे वकिल अभिषेक एंदे यांनी न्यायालयात केला.

loading image
go to top