साउथची मलायका अरोरा मराठीच्या 'बिग बॉस'मध्ये ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Heena Panchal is first wild card entry in bigg boss season 2

बॉलिवूडची चर्चित नायिका मलायका अरोरा सारखाच या चेहऱ्याची ठेवण असलेली आयटम साँग गर्ल हीना पांचाळ 'बिग बॉस मराठी 2' च्या घरात प्रवेश करणार आहे.

साउथची मलायका अरोरा मराठीच्या 'बिग बॉस'मध्ये !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरात एक स्पेशल चेहरा आता प्रेक्षकांना दिसणार आहे. या स्पेशल चेहऱ्याची विशेषतः म्हणजे बॉलिवूडची चर्चित नायिका मलायका अरोरा सारखाच या चेहऱ्याची ठेवण आहे! चकीत झालात ना? हो, ही नायिका आहे हीना पांचाळ.

साउथची नृत्यांगना हीना पांचाळ वीकेंडचा डाव मध्ये वाइल्ड कार्ड एंट्रीने 'बिग बॉस मराठी 2' च्या घरात प्रवेश करणार आहे. ही माहिती खुद्द शोचे सुत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी जाहीर केली. हीनाच्या बिग बॉसच्या स्टेजवरील एंट्रीचा टीझर व्हायरल होत आहे. 

 हीना ही साउथच्या चित्रपटांमध्ये आयटम साँगसाठी प्रसिध्द आहे. बिग बॉसच्या घरातील स्पर्धक शिवानी सुर्वेने मानसिक त्रास होत असल्याने घराबाहेर जायचे असल्याचा तगादा लावला होता. तिला मांजरेकरांनी बॅग भरुन बाहेर यायला सांगितल्यानंतर ती घराबाहेर आली. तिच्यानंतर आता हीनाने घरात एंट्री घेतली. 

 

loading image
go to top