Hema Malini Birthday: विवाहित धर्मेंद्रच्या प्रेमात आकंठ बुडाल्या होत्या हेमा मालिनी.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hema malini birthday hema and dharmendra love story marriage

Hema Malini Birthday: विवाहित धर्मेंद्रच्या प्रेमात आकंठ बुडाल्या होत्या हेमा मालिनी..

Happy Birthday Hema Malini: बॉलीवूडची 'ड्रीम गर्ल' असणा-या हेमा मालिनी यांचा आज जन्मदिवस. आज त्या आपला 74 वा वाढदिवस साजरा करत आहेत. हेमा यांनी आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने कायमच प्रेक्षकांना घायाळ केले आहे. वयाच्या 74 व्या वर्षीही त्या अत्यंत देखण्या आणि सतेज दिसतात. केवळ अभिनेत्री नाही तर खासदार हेमा मालिनी अशीही त्यांची ओळख आहे. पण त्यांच्या करियर प्रमाणेच त्यांचे वैयक्तिक आयुष्यही तितकेच रंजक आहे. जेव्हा त्यांच्या जीवनप्रवासाविषयी बोललं जातं तेव्हा एक महत्वाची घटना कायम समोर येते, ते म्हणजे त्यांचं आणि धर्मेंद्र यांचं प्रेम. एका विवाहित पुरुषासोबत प्रेम करणं आणि लग्न करणं हे त्यावेळी सोप्पं नव्हतं. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया कशी जमली बसंती आणि वीरूची जोडी..

(hema malini birthday hema and dharmendra love story marriage )

हेही वाचा: Hema Malini Birthday: बॉलीवुडची ड्रीम गर्ल गाजवतेय राजकीय मैदान! वाचा सविस्तर..

एखाद्या चित्रपटाची कथा वाटावी अशी हेमा(Hema Malini) आणि धर्मेंद्र (Dharmendra)  यांची लव्हस्टोरी आहे. त्यांचं प्रेम आणि लग्न हे खरच सोप्पं नव्हतं, त्यासाठी दोघांनाही खूप काही सोसवं लागलं. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची पहिली भेट 1970मध्ये ‘तुम हसीन, मैं जवाँ’ चित्रपटाच्या दरम्यान झाली. या चित्रपटात दोघेही मुख्य भूमिकेत होते आणि तिथेच खरी त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली. पण त्या वेळी धर्मेंद्र यांचे लग्न झाले होते. एवढेच नाही तर त्यांना दोन मुलंही होती. प्रकाश कौर धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी तर बॉबी देओल आणि सनी देओल ही त्यांची दोन मुले. त्यामुळे हे प्रेम पुढे कसे जाणार याची दोघांनाही कल्पना नव्हती.

दरम्यान हेमा मालिनी यांना लग्नासाठी अनेक प्रस्ताव आले होते. परंतु, त्यांनी सर्व प्रस्ताव नाकारले. कारण हेमा यांच्या मनात केवळ धर्मेंद्र यांच्यासाठीच जागा होती. एवढेच नही तर हेमा मालिनी यांच्यासाठी जितेंद्र यांनीही लग्नाचा प्रस्ताव टाकला होता पण ते देखील यशस्वी होऊ शकले नाही. हेमा यांनाही विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडायचे नव्हते पण धर्मेंद्र यांनी जणू हेमा यांचे मनच जिंकले असल्याने त्या या प्रेमात वाहत गेल्या.

असे म्हणतात की, जेव्हा शोले चित्रपटाचे चित्रीकरण चालू होते, तेव्हा धर्मेंद्र लाईट बॉयला पैसे देऊन मुद्दाम लाईट बिघडवायला सांगायचं. जेणेकरून सारखे रिटेक्स होत राहतीक आणि त्यांना हेमा मालिनी यांना मिठी मारण्याची संधी मिळेल. जेव्हा शोले रिलीज झाला तेव्हा धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांना वेड लावले. त्यावेळी खऱ्या अर्थाने दोघांना एकमेकांच्या प्रेमाची जाणीव झाली.

(Dharmendra and Hema Malini iconic love story)

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: आज कुणाची खैर नाही, मांजरेकर करणार सदस्यांची ऐशीतैशी..

त्यानंतर 5 वर्षांनी 1980 साली दोघांनी एकमेकांशी लग्न केले. पण या लग्नासाठी दोघांनाही बरेच सायास करावे लागले. कारण धर्मेंद्र विवाहित असल्याने त्यांच्या पत्नीचा घटस्फोट द्यायला नकार होता. तर हेमा यांचे वडील आणि कुटुंबीयांनाही हे नाते मान्य नव्हते. असं म्हणतात की, धर्मेंद्र यांना हेमा यांच्या वडिलांनी अक्षरशः धक्के मारून घरातून बाहेर काढले आहे. तुझ्या सारख्या विवाहित पुरुषाला मुलगी द्यायची नाही. तू तिच्या आयुष्यातून निघून जा. असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं.

शेवटी हे प्रेम यशस्वी करण्यासाठी धर्मेंद्र यांना धर्म बदलावा लागला. प्रेमासाठी दोघांनीही इस्लाम धर्म स्वीकारला आणि अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडले. पुढे धर्मेंद्र यांच्या स्वभावाने हेमा यांच्या कुटुंबांचे मन जिंकले. त्या दोघांना दोन मुलीही झाल्या. त्यांच्या प्रेमावर खूप टीका झाली, खूप चर्चा झाल्या पण दोघांनीही हार न मानता प्रेम यशस्वी केले.

टॅग्स :Hema Malini