
Hema Malini : १४ नाले आहेत, २० बंद केलेत, ०४ राहिलेत! बसंतीचं अजब गणित, नेटकऱ्यांचा डोक्याला हात
Hema Malini : बॉलीवूडमध्ये गेल्या चार दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयानं चाहत्यांचे मनोरंजन करणाऱ्या ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांची गोष्टच वेगळी आहे. आपल्या सौंदर्यानं, अभिनयानं हेमाजींनी लाखो चाहत्यांना आपलेसे केले आहे. हेमाजींचा एक व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे.
खासदार असणाऱ्या हेमा मालिनी यांनी मतदार संघातील जे प्रलंबित प्रश्न होते त्यावर भाष्य केले आहे. काही दिवसांपासून त्यांच्या मतदार संघातील प्रश्न घेऊन मतदारांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी तो प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. प्रलंबित प्रश्नाचे कामकाज झाल्यानंतर त्याविषयी त्यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.
Also Read- कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...
हेमा मलिनी यांनी आपण १४ नाल्यांचे काम केले, त्यातील २० नाल्यांचे काम पूर्ण झाले आणि ४ नाल्यांचे राहिले आहे. असे सांगितले आहे. पत्रकारांना विचारण्यात आलेल्या त्या प्रश्नानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेटकऱ्यांनी हेमाजींना तुम्ही नेमकं किती नाल्यांचे काम केले आहे हे विचारले आहे. बाकीच्यांनी हेमाजींना ट्रोल केले आहे.
एकानं मात्र हेमाजींची बाजू घेत त्यांचा भाषेचा प्रश्न असल्यानं हिंदीतून त्यांना तितक्याशा सफाईदारपणे बाजू मांडला आली नाही. असे त्या नेटकऱ्यानं म्हटले आहे. दरम्यान हेमा मालिनी यांचा तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हेमाजींनी बृज चौक सुशोभिकरणात महत्वाची भूमिका बजावली आहे.