ड्रीमगर्ल हेमा मालिनी यांनी कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या चर्चांवर दिला पूर्ण विराम, व्हिडिओमधून केला खुलासा

hema malini
hema malini

मुंबई- कोरोना व्हायरसचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी देखील कोरोनाच्या विळख्यात आहेत. नुकतीच अमिताभ बच्चन, अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्याला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली होती. त्यामुळे अनेक सेलिब्रिटींसह चाहत्यांना मोठा धक्का बसला. याचदरम्यान ड्रीमगर्ल हेमा मालिनी बाबतही अनेक बातम्या यायला लागल्या.  हेमा मालिनी देखील कोरोना पॉझिटीव्ह असल्याच्या चर्चा सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्या.

बच्चन कुटुंबिय कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर बी-टाऊनमध्ये तणावाचं वातावरण आहे. याचदरम्यान अभिनेत्री हेमा मालिनी कोरोना पॉझिटीव्ह आल्या आहेत आणि त्या हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत अशा चर्चा सोशल मिडियावर होऊ लागल्या. मात्र आता या अफवांना खुद्द हेमा मालिनी यांनीच पू्र्ण विराम दिला आहे. हेमा मालिनी यांनी त्यांच्या सोशल मिडियावरुन या सगळ्या चर्चांचं खंडन केलं आहे. 

या व्हिडिओमध्ये हेमा मालिनी त्यांच्या चाहत्यांना सांगतायेत, राधे राधे, माझी तब्येत ठीक नाही, मी हॉस्पिटलमध्ये दाखल आहे अशा प्रकारच्या अफवा सगळीकडे पसरत आहेत. मात्र मी माझ्या चाहत्यांना आणि शुभचिंतकांना सांगू इच्छिते की मला काहीही झालेलं नाही. मी पूर्णपणे व्यवस्थित आहे. मी तुमच्या आशिर्वादामुळे आणि कृष्ण भगवान यांच्या कृपेने ठीक आहे. 

हेमा मालिनी यांनी आता स्वतःच त्यांच्या कोरोना बाबतच्या अफवांबाबत खुलासा केल्याने चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. शनिवारी बच्चन कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याने संपूर्ण देश हादरला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, बच्चन कुटुंबामध्ये केवळ जया बच्चन यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. अमिताभ यांच्यासोबत अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्याचा रिपोर्ट देखील पॉझिटीव्ह आला आहे. अमिताभ यांच्यानंतर अनुपम खेर यांच्या घरात देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याचं समोर आलं होतं. त्याचबरोबर टीव्ही अभिनेता पार्थ सामथान देखील कोरोना पॉझिटीव्ह आल्याचं कळालं आहे.   

hema malini denied on corona infected said i am completely fine  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com