esakal | 'चाळीस वर्ष दिली साथ, कोरोनानं शेवटी घात केलाच'
sakal

बोलून बातमी शोधा

Hema Malini and Mehta

'चाळीस वर्ष दिली साथ, कोरोनानं शेवटी घात केलाच'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतो आहे. त्याला सामोरं जाताना सर्वांनाच नाकी नऊ आले आहेत. अशा परिस्थितीत सरकारनंही अनेक निर्बंध आणले आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन केले आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. बॉलीवूडमध्येही कोरोना वेगानं पसरतो आहे. आतापर्यत कित्येक सेलिब्रेटी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. काही जणांना त्यात आपला जीवही गमवावा लागला आहे. प्रसिध्द अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांचे सेक्रेटरी असलेले मेहता (Secretery Mehata) यांचे कोरोनानं निधन झाले आहे. हेमा मालिनी यांनी याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन माहिती दिली आहे.

गेल्या चाळीस वर्षांहून अधिक काळ मेहता यांनी हेमा मालिनी (Hema Malini) यांच्यासाठी काम केले. त्यांच्या निधनानं हेमा मालिनी यांनी शोक व्यक्त करुन मेहता यांना श्रध्दांजलीही वाहिली आहे. मेहता यांना काही दिवसांपासून कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी एका रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. मात्र त्यादरम्यान त्यांचे निधन झाले. कोरोनाची दुसरी लाट धोक्याची ठरत असताना त्यात अनेक सेलिब्रेटींना आपला जीव गमवावा लागला आहे.

दोन दिवसांपूर्वी अभिनेत्री श्रीप्रदा (Actress shriprada) यांचेही कोरोनानं निधन झाले होते. हेमा मालिनी (Hema Malini) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन मेहता यांना श्रध्दांजली वाहिली आहे. त्यांनी व्टिट करताना असे म्हटले आहे की, मेहता यांचे जाणे माझ्यासाठी क्लेशकारक आहे. मला खूप वाईट वाटले आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून त्यांनी माझे सेक्रेटरी म्हणून काम पाहिले होते. मेहता यांच्याविषयी सांगायचे झाल्यास ते अतिशय मेहनती, प्रामाणिक व्यक्ती होते. कधीही न कंटाळता काम करत राहणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळे ते नेहमीच लक्षात राहतील.

हेही वाचा: कोरोना रुग्णांच्या मदतीला धावली सारा; सोनू सूदनं केलं कौतुक

हेही वाचा: उधाराची साडी, रबर बँडची अंगठी; १५० रुपयांत पार पडलं अभिनेत्याचं लग्न

यावेळी हेमा मालिनी यांनी मेहता यांचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओलनंही (Esha deol) मेहता यांना श्रध्दांजली वाहिली आहे. तिनं लिहिलं आहे की, आम्हा सर्वांनाच त्यांची नेहमीच आठवण येईल. ते आमच्या परिवारातीलच एक सदस्य होते.