'तू आई कधी होणार' नेटकऱ्याच्या या प्रश्नावर भडकली हेमांगी; म्हणाली.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hemangi kavi angry  reaction on fans comment who ask her When will you become a mother?

'तू आई कधी होणार' नेटकऱ्याच्या या प्रश्नावर भडकली हेमांगी; म्हणाली..

hemangi kavi : हेमांगी कवी हे मराठी मनोरंजन विश्वातील एक महत्वाचं नाव. अनेक मालिका, चित्रपट, नाटक तिच्या कसदार अभिनयाने गाजले आहेत. अभिनयासोबतच निरनिराळ्या कारणाने ती चर्चेत असते. ती अत्यंत परखडपणे आपले पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोहचवत असते. त्यामुळे बऱ्याचदा तिला खूप ट्रॉल केले जाते. तर कधी तिच्या बेधडकपणामुळे कौतुकाची थापही तिला मिळते. आज हेमांगी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. वैयक्तिक प्रश्न विचारला म्हणून तिने एका नेटकऱ्याचे अक्षरशः वाभाडे काढले आहे.

(hemangi kavi angry reaction on fans comment who ask her When will you become a mother?)

हेमांगीच्या एका पोस्टवर एका महिलेने कमेंट केली होती की, 'हेमू तू आई कधी होणार'.. ही कमेंट हेमंगीच्या जिव्हारी लागलेली दिसतेय. या कमेंटवरुन हेमांगीने त्या महिलेचा चांगलाच समाचार घेतलेला दिसतोय. यावर हेमांगी म्हणते, नं अतिशय स्पष्टच उत्तर दिल्याचं दिसून आलं. कमेंटवर प्रतिक्रिया देताना हेमांगीनं म्हटलं की. 'तुम्हाला नाही वाटत हा खूप पर्सनल प्रश्न आहे. आणि तो हा असा तुमच्यासारख्या शिकलेल्या व्यक्तीने येणं चुकीचं आहे. मी तुमची ही कमेंट इगनोर करु शकते. पण मला तुम्हाला आणि आपल्या सारख्या लोकांना कळवायचंय की, तू लग्न कधी करणार, तुमचा घटस्फोट झालाय का?, तू आई कधी होणार, तुम्हाला किती मुलं आहेत, तुमचा पगार किती आहे, हे असले पर्सनल प्रश्न कधी कुणालाही विचारु नये'. धन्यवाद!

हेमांगीच्या या उत्तरानं अनेकांची झोप उडाली आहे. तीची ही कमेंट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणार व्हायरल होत आहे. हेमांगीने या आधीही अनेकदा नेटकऱ्यांना धारेवर धरले आहे. आजही संबधित व्यक्तीने अगदीच खासगी प्रश्न विचारल्याने हेमांगीचा संताप झालेला दिसतोय.

Web Title: Hemangi Kavi Angry Reaction On Fans Comment Who Ask Her When Will You Become A Mother

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :hemangi kavi