hemangi kavi dream come true she perform in royal opera house marathi actress
hemangi kavi dream come true she perform in royal opera house marathi actressSAKAL

Hemangi Kavi: २ सप्टेंबरला हेमांगी कवीचं स्वप्न पूर्ण होणार.. सोशल मीडियावर दिली आनंदाची बातमी

२ सप्टेंबरला हेमांगीचं स्वप्न पूर्ण होणार आहे

Hemangi Kavi News: हेमांगी कवी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. हेमांगीने आजवर विविध सिनेमा, मालिका आणि नाटकांंमधून आजवर अभिनय केलाय. हेमांगी सोशल मिडीयावर विविध पोस्टच्या माध्यमातुन चाहत्यांच्या संपर्कात असते.स

हेमांगी तिच्या पोस्टच्या माध्यमातुन सामाजिक, राजकीय टिका - टिप्पणी करताना दिसतेय. हेमांगीने नुकतीच एक पोस्ट केलीय. ज्यात तिने तिच्या फॅन्सना तिचं स्वप्न पूर्ण होणार असं सांगुन आनंदाची बातमी दिलीय.

(hemangi kavi dream come true she perform in royal opera house)

hemangi kavi dream come true she perform in royal opera house marathi actress
Meera Joshi: बॉयफ्रेंडचा चेहरा दाखवत लग्नाची तारीखच सांगितली, मराठमोळ्या मीरा जोशीचा खुलासा

अनेक वर्षांपासुनचं हेमांगीचं स्वप्न अखेर पूर्ण होणार

हेमांगीने तिच्या सोशल मिडीयावर एक पोस्ट केलीय. यात तिने तिचं स्वप्न पूर्ण होणार असल्याचं सांगितलंय. काय आहे हेमांगीची पोस्ट पाहू..

हेमांगी लिहीते, "‘रॅायल अॅापेरा हाऊस’, अनेक वर्षांपासूनचं स्वप्न होतं या वास्तूत, नाट्यगृहात नाटकाचा प्रयोग करता यावा. २ सप्टें. ला हे स्वप्न पूर्ण होणार आहे. प्रचंड आनंद होत आहे. तुम्ही ही माझ्या या आनंदात सामील व्हायला नक्की या!"

अशाप्रकारे मुंबईतील चर्नी रोड येथील रॉयल ऑपेरा हाऊस मध्ये हेमांगाीच्या जन्मवारी नाटकाचा प्रयोग रंगणार आहे. त्यानिमित्ताने रॉयल ऑपेरा हाऊस मध्ये प्रयोग करण्याचं हेमांगीचं स्वप्न पूर्ण होईल.

वाढदिवसानंतर हेमांगीने मागितली माफी

हेमांगीचा नुकताच वाढदिवस झाला. पण वाढदिवसानंतर हेमांगीने चाहत्यांची माफी मागितली. यात तिने काही फोटो शेयर केले आहेत. फोटो शेयर करत तिने लिहिले की, "काल तुम्ही माझ्या वाढदिवसानिमित्त वेळात वेळ काढून मला शुभेच्छा देण्यासाठी msgs, phone calls, Dms केले त्यासाठी मी तुमचे आभार मानते. काहींचे calls मी घेऊ शकले नसेन, msgs वाचू शकले नसेन, reply देऊ शकले नसेन, tags पाहू शकले नसेन, stories remention करू शकले नसेन तर मोठ्या दिलानं तुम्ही मला माफ कराल अशी मी आशा करते."

हेमांगी कवीचं वर्कफ्रंट

काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्यारवी जाधव दिग्दर्शित 'ताली' वेबसीरीज मध्ये हेमांगी दिसली. तिची ही सिरिज जियो सिनेमा या ओटीटीवर रिलीज झाली.

यात स्वाती ही भूमिका साकारत तिने पुन्हा एकदा तिच्या अभिनयाचं प्रेक्षकांची मन जिंकली. त्याचबरोबर हेमांगीची दो गुब्बारे ही वेब सीरिज देखील रिलिज झाली आहे.

सध्या ती ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेत काम करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com