Hemangi Kavi Video : सोशल मीडिया रिल्स स्टारच्या कानातून हेमांगीनं काढला जाळ, काय म्हणाली पाहा?

मराठी मनोरंजन विश्वामध्ये अभिनेत्री हेमांगीची सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.
Hemangi Kavi Marathi actress Facebook post fashion
Hemangi Kavi Marathi actress Facebook post fashionesakal

Hemangi Kavi Marathi actress Facebook post fashion : मराठी मनोरंजन विश्वामध्ये अभिनेत्री हेमांगीची सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. आपल्या अभिनयामुळे तिनं चाहत्यांची पसंती मिळवली आहे. अशावेळी हेमांगी ही देखील तिच्या प्रतिक्रियांमुळे नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा विषय असल्याचे दिसून आले आहे.

आता हेमांगीनं सोशल मीडियावरून जो व्हिडिओ व्हायरल केला आहे त्यातून तिनं सध्याचे ते सोशल मीडिया इन्फ्ल्युंसर आहेत त्यांच्यावर वेगळ्या शैलीत टीका केली आहे. ती पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. खासकरुन फॅशन विषयी रिल्स करणाऱ्यांचा हेमांगीनं चांगलाच समाचार घेतला आहे. तिनं त्यांची स्पष्ट शब्दांत कानउघाडणीही केली आहे.

हेमांगी त्या व्हिडिओमध्ये म्हणते, मला एक प्रश्न पडला आहे की, सोशल मीडियावरच्या ज्या फॅशन इन्फ्लुंसरच आणि स्टायलिस्ट असतात, त्या प्रत्येकवेळी नवीन काय आलं ते सांगत असतात. घरात त्या वस्तूंचे आलेले बॉक्स अनबॉक्स करतानाचे व्हिडिओ दाखवणे आणि प्रेक्षकांना सांगणे हे मी पाहते. मला त्यांना एक विचारायचे आहे की, एवढे कपडे तुम्ही मागवता पण नंतर ते पुन्हा वापरता का, मुळात एवढे कपडे ठेवता कुठे....

मला तुमच्याकडे पाहिल्यावर तुम्हाला विचारावेसे वाटते की, तुम्ही काय करता आणि काय करायचं तुमचं, सहा सहा महिने मी शॉपिंग करत नाही. ऑनलाईन शॉपिंगही वर्षातून एकदा करते. तरीसुद्धा माझ्याकडे जे कपडे आहेत त्याचा मला त्रास होतो. आणि तुम्ही असे का करता, तुम्ही करता काय एवढ्या कपड्यांचे असा प्रश्न हेमांगीनं त्या पोस्टमधून

यापूर्वी देखील हेमांगी तिच्या पोस्ट आणि व्हिडिओमुळे चर्चेत आल्याचे दिसून आले आहे. लोकं आपल्याविषयी काय विचार करतात त्यापेक्षा आपल्याला भवतालविषयी काय वाटते हे नेहमीच हेमांगीनं धाडसानं सांगितले आहे. यामुळे कित्येकदा ट्रोलही व्हावे लागले होते. त्यावरुन तिनं नेटकऱ्यांना सणसणीत शब्दांत उत्तरं दिली होती.

Hemangi Kavi Marathi actress Facebook post fashion
Viral Video: देशी 'मनी हाईस्ट'! भर रस्त्यात कार आडवी करून तरुणाने उधळले पैसे

हेमांगीच्या प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास ती काही दिवसांपूर्वी सुश्मिता सेनसोबत दे टाली नावाच्या सीरिजमध्ये दिसून आली होती. त्यात तिनं एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. याशिवाय मन धागा धागा जोडते नवा नावाच्या मालिकेतही हेमांगीनं केलेली भूमिका प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय असते.

Hemangi Kavi Marathi actress Facebook post fashion
Jawan SRK Fan Meet: कोणी मिठी मारलं, कोणी पाया पडलं, जवान सुपरहिट झाल्याने शाहरुखचं फॅन्सना खास गिफ्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com