
हेमांगी कवी फिरवतेय लिंबू... पेट्रोल दरवाढीवर केला उपाय
Entertainment News : हेमांगी कवी हे मराठी मनोरंजन विश्वातील एक महत्वाचं नाव. अनेक मालिका, चित्रपट, नाटक तिच्या कसदार अभिनयाने गाजले आहेत. अभिनयासोबतच निरनिराळ्या कारणाने ती चर्चेत असते. विशेष म्हणजे अभिव्यक्तीच्या आधारावर अत्यंत परखडपणे आपले पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोहचवत असते. त्यामुळे ती कायमच सोशल मीडियावर आपल्याला सक्रिय दिसते. सध्या तिने एक फेसबुक पोस्ट केली असून त्यामध्ये चक्क लिंबू फिरवण्याचा उल्लेख आहे. या पोस्टवर चाहत्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या असून हेमांगीनेही त्यांना उत्तरे दिली आहेत.
हेही वाचा: मुकेश ऋषी साकारणार अफजलखान, म्हणाले.. शिवाजी महाराज होते म्हणून भारताकडे..
हेमांगी नेहमी व्हिडीओ, रिल्स करण्याला प्राधान्य देते पण यंदा तिने तिचे विचार लिहून कळवले आहेत. आपल्या फेसबूक अकाउंट द्वारे तिने सध्या ज्वलंत विषयावर भाष्य केलं आहे. यावेळी हेमांगीने तुमचा आमचा कळकळीचा असा पेट्रोल दरवाढीचा मुद्दा घेतला आहे. सध्या आपण सगळेच पेट्रोल दरवाढीने हैराण आहोत. पेट्रोलने जवळपास १२० रुपयांचा टप्पा गाठल्याने सामान्यांच्या खिशाला कातर लागली आहे. चाकरमानी अक्षरशः हैराण झाले आहेत. अशातच ही पोस्ट म्हणजे हेमांगीने चाहत्यांचा विषय मांडल्यासारखं आहे.
हेही वाचा: लागली का गोळी.. म्हणत हेमांगी करतेय घायाळ
या फेसबुक पोस्टमध्ये पेट्रोल विषयी ती लिहिते, “ह्या पेट्रोल दरवाढी वर लिंबू फिरवायचा होता मला पण आता…लिंबू वर पेट्रोल फिरवणार आहे!” या गमतीशीर पण तितक्याच गंभीर पोस्टवर चाहते प्रतिक्रिया देत आहेत. कालपासून ही पोस्ट भलतीच चर्चेत आहे. “खूप उशिरा पोहोचला पेट्रोलचा चटका” अशी प्रतिक्रिया एकाने दिली आहे. त्यावर हेमांगी म्हणते, ''माझ्या सहिष्णुतेवर उपाय शोधा, धपली काढू नका.'' तर एका चाहत्याने म्हंटले आहे, “तुमच्या घरातली सायकल आता बाहेर काढा.” या चाहत्याला उत्तर देताना हेमांगी म्हणाली,''खूपच बारीक लक्ष आहे तुमचं'' अशा धमाल प्रतिक्रिया आणि त्यावर हेमांगीची कमाल उत्तरे यांची मैफलच जणू रंगली आहे.
Web Title: Hemangi Kavi Post On Petrol Price
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..