
लागली का गोळी.. म्हणत हेमांगी करतेय घायाळ
Entertainment News :हेमांगी कवी हे मराठी मनोरंजन विश्वातील एक महत्वाचं नाव. अनेक मालिका, चित्रपट, नाटक तिच्या कसदार अभिनयाने गाजले आहेत. अभिनयासोबतच निरनिराळ्या कारणाने ती चर्चेत असते. विशेष म्हणजे अभिव्यक्तीच्या आधारावर अत्यंत परखडपणे आपले पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोहचवत असते. त्यामुळे ती कायमच सोशल मीडियावर आपल्याला सक्रिय दिसते. सध्या तिच्यातली लावण्यवती बाहेर आली असून एक धमाल व्हिडीओ तिने तयार केला आहे.
हेही वाचा: सायरा बानाेंची अवस्था बिकट ; शत्रुघ्न, धर्मेंद्र हळहळले..
अभिनेत्री हेमांगी कवी (hemangi kavi) पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आली आहे. यंदा तिचा खास अंदाज चाहत्यांना पाहायला मिळतोआहे. कारण चक्क लावण्यवतीचे रुप धारण करुन चाहत्यांना घायाळ केले आहे. पण यंदा नजरेचा बाण नाही तर थेट गोळीच तिने चाहत्यांच्या काळजात मारली आहे. अभिनयापलीकडे अनेक सामाजिक विषयांवर, स्त्रियांच्या प्रश्नांवर बेधडक मत मांडत असल्याने हेमांगी चर्चेत असते.
हेही वाचा: या कलाकारांना 'रणबीर आलिया'च्या लग्नात आमंत्रण नाही, कारणही आहे धक्कादायक..
हेमांगीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ऍक्टिव्ह असण्याबरोबरच ट्रेंडिंग गाण्यांवर व्हिडीओ पोस्ट करत असते.अलीकडे तीने असाच एक व्हिडीओ तीच्या इंस्टाग्राम अकाउंटला पोस्ट केला आहे. या व्हिडिओत डोळ्यांनी इशारे करत जणू ती बंदूकीचा निशाणा साधतेय. 'पोचला का बाण तसं लागली का गोळी! अखियो से गोली मारे!!!' असे कॅप्शन देत तीने हा व्हिडीओला दिले आहे.
हेही वाचा: सुशांतसिंग प्रकरणाची RTI व्दारे माहिती मागितल्यावर CBI चे धक्कादायक उत्तर
साडी नेसून मराठमोळ्या लूक मध्ये तिने ही अदाकारी केली आहे. या व्हिडिओला तिने गाण्याऐवजी बंदुकीचा आवाज दिला आहे. शिवाय हॅशटॅग नथीचा नखरा,ट्रॅडिशनल अशी काही टॅग्स लावत हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. तर एकाने 'मरता मरता वाचलो' अशी भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे.
Web Title: Hemangi Kavi Posted Reel On
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..