'ही प्रेमवेडी राधा'! श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त गायक मंगेश बोरगावकरची चाहत्यांसाठी खास भेट

संतोष भिंगार्डे
Monday, 10 August 2020

 श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त एक खास गाणे त्याच्या चाहत्यांसाठी आणले आहे. 'ही प्रेमवेडी राधा' असे ते गाणे आहे आणि मंगेशने आपल्या सुमधुर आवाजात ते गायले आहे.

मुंबई ः महाराष्ट्राचा लाडका गायक मंगेश बोरगावकरने आतापर्यंत अनेक अल्बम आणि गाणी केली आहेत. कित्येक ठिकाणचे स्टेज शो त्याने केले आणि चाहत्यांची वाहव्वा मिळविली. आता  श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त एक खास गाणे त्याच्या चाहत्यांसाठी आणले आहे. 'ही प्रेमवेडी राधा' असे ते गाणे आहे आणि मंगेशने आपल्या सुमधुर आवाजात ते गायले आहे.

रिया चक्रवर्तीनंतर ईडी करणार निर्माता संदीप सिंहची चौकशी - 

मंगेशच्याच मीडिया वर्क्स स्टुडिओ पुण्यात आहे. या स्टुडिओचा शुभारंभ या गाण्याद्वारेच करण्यात आला आहे. नीतेश मोरेने या गाण्याला संगीतसाज चढविला आहे तर हे गाणे लिहिले आहे रवींद्र नाईकने. सागरिका म्युझिकने हे गाणे आणले आहे. लाॅकडाऊनचे नियम पाळून हे गाणे बनविण्यात आले आहे. अनिता सावंत-देशपांडे यांनी या गाण्यावर पेंटिग्ज तयार केले आणि तो व्हिडीओ बनविण्यात आला आहे. राधा-कृष्ण चित्रांतून सादर करण्यात आले आहेत. काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मोहित शांडिल्य या तरुण कलाकाराने मिक्सिंगचे काम केले आहे. 

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Hi Premvedi Radha'! Special gift for singer Mangesh Borgaonkar for fans on the occasion of Shrikrishna Janmashtami