
सध्याच्या या लॉकडाऊनच्या दरम्याने अनेकांची क्रिएटीव्हीटी बाहेर येत आहेत...मालिकांवरचे मीम्सही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत..त्यातंच आता भर पडलीये ती या व्हिडिओची..हम आपके है कौनमधील या गाण्याच्या व्हिडिओ खुपंच व्हायरल होतोय..
मुंबई- सध्या लॉकडाऊनमुळे अनेकजण घरात बसून कंटाळले आहेत..या मिळालेल्या वेळात काही जण स्वतःच्या फिटनेसकडे जास्त लक्ष देत आहेत तर काहीजण स्वतःचे छंद नव्याने करु पाहत आहेत..यासगळ्यासोबतंच मोबाईलपासून मात्र कोणी लांब गेलेलं नाही..सगळ्यांच्या हातात वेळ घालवण्यासाठी मोबाईलंच पाहायला मिळतोय..त्यातंच सोशल मिडीयाचा भर...त्यामुळे सतत सोशल मिडीयावर ऍक्टीव्ह असणारे देखील काही जण आहेत..सध्याच्या या लॉकडाऊनच्या दरम्याने अनेकांची क्रिएटीव्हीटी बाहेर येत आहेत...मालिकांवरचे मीम्सही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत..त्यातंच आता भर पडलीये ती या व्हिडिओची..हम आपके है कौनमधील या गाण्याच्या व्हिडिओ खुपंच व्हायरल होतोय..
आलोकनाथ आणि रीमा लागू यांच्यावर चित्रीत झालेलं आज हमारे दिल मै हे प्रसिद्ध गाणं आहे..या गाण्याला नव्याने एडिट करुन मनोरंजनासाठी व्हायरल करण्यात आलं आहे..हार्डी संधूचं नाह गोरिए हे गाणं एडिट करुन यावर वापरण्यात आलं आहे..हार्डीच्या या गाण्यात नोरा फतेही ठुमके लगावताना दिसलेली..या गाण्याचे बोल तंतोतंच जुळवत आलोकनाथ आणि रिमा लागू यांच्यावर हे गाणं एडिट करुन व्हायरल करण्यात आलं आहे..
याभन्नाट व्हिडिओला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे..सध्याच्या लॉकडाऊनच्या दरम्यान डोक्यावरील ताण कमी करण्यासाठी अशा व्हिडिओजचा प्रेक्षक आवर्जुन आस्वाद घेताना दिसतात..माधुरी दिक्षीत आणि सलमान खान स्टारर हम आपके है कौन हा सिनेमा १९९४ मध्ये रिलीज झाला होता..हा सिनेमा प्रेक्षकांनी चांगलाच उचलून धरला..आजही हा सिनेमा चाहते आवडीने पाहतात..
या सिनेमात रिमा लागू, अनुपम खेर, आलोकनाथ, रेणूका शहाणे यांच्या देखील महत्वाच्या भूमिका आहेत..हा व्हिडिओमुळे लोकांच्या चेह-यावर हासू तर आलंच सोबतंच दिवंगत अभिनेत्री रिमा लागू यांची एक झलक देखील यानिमित्ताने पाहायला मिळाली..
this hilarious edit of iconic song from hum aapke hain koun going viral