शेहनाज गिलच्या 'त्वाडा कुत्ता टॉमी' डायलॉगवर अमेरिकन शो 'फ्रेंड्स'चा हा तडका पाहून व्हाल लोटपोट

दिपाली राणे-म्हात्रे
Monday, 28 December 2020

शेहनाज गिलच्या याच डायलॉग विद म्युझिकल बिट्ससोबत एक व्हिडिओ एडिट केला आहे जो सध्या सोशल मिडियावर झुमाकुळ घालतोय. या व्हिडिओमध्ये शेहनाजच्या या प्रसिद्ध डायलॉगवर अमेरिकन शो 'फ्रेंड्स'चे काही मजेशीर क्षण एडिट केले गेले आहेत.

मुंबई- काही दिवसांपूर्वी सगळ्यांच्या तोंडी एकच प्रश्न होता तो म्हणजे 'रसोडे मै कौन था?' 'साथ निभाना साथिया' मालिकेतील कोकिलाबेनचा हा डायलॉग अतंरगी अंदाजात रिक्रिएट केला गेला होता आणि सोशल मिडियावर प्रचंड गाजला होता. हा मजेशीर आणि हटके व्हिडिओ तयार केला होता युट्युबर यशराज मुखातेने. यानंतर यशराजने अनेक व्हिडिओ केले तेही चर्चेत राहिले मात्र नुकताच त्याने 'बिग बॉस १३' ची स्पर्धक राहिलेल्या शेहनाज गिलच्या 'त्वाडा कुत्ता टॉमी, साडा कुत्ता कुत्ता' या डायलॉगचा मस्त म्युझिकल ट्विस्ट दिला होता जो सगळ्यांना प्रचंड आवडला. 

हे ही वाचा: मुंबईहून न्युयॉर्कला रवाना झाली शाहरुखची लेक सुहाना खान

शेहनाज गिलच्या याच डायलॉग विद म्युझिकल बिट्ससोबत एक व्हिडिओ एडिट केला आहे जो सध्या सोशल मिडियावर झुमाकुळ घालतोय. या व्हिडिओमध्ये शेहनाजच्या या प्रसिद्ध डायलॉगवर अमेरिकन शो फ्रेंड्सचे काही मजेशीर क्षण एडिट केले गेले आहेत. हा व्हिडिओ केतन बक्शी नावाच्या एक व्हिडिओ एडिटरने एडिट केला आहे. हा व्हिडिओ सोशल मिडिया युजर्सना खूप पसंत पडतोय. त्यामुळे या व्हायरल व्हिडिओची आता जोरदार चर्चा होताना दिसतेय. 

व्हिडिओमध्ये अमेरिकन टीव्ही शो फ्रेंड्सच्या रॉस आणि रशेलच्या भांडणापासून ते जॉयच्या ड्रम वाजवण्यापर्यंतच्या सीनपर्यंत इतर अनेक सीन्स एडिट केले गेले आहेत. या व्हिडिओला इंस्टाग्रामवर दीड लाखापेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. तर सोशल मिडिया युजर्स या व्हिडिओच्या खाली कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत म्हटलंय की, आत्तापर्यंतचा हा सगळ्याच मजेशीर व्हिडिओ आहे. तर काहीजण शेहनाजच्या त्वाडा कुत्ता टॉमी, साडा कुत्ता कुत्ताचं आत्तापर्यंतचं सगळ्यात जबरदस्त व्हर्जन मानत आहेत.  

hilarious video of shehnaaz gills sadda kutta kutta twada kutta tommy with friends epic moments  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hilarious video of shehnaaz gills sadda kutta kutta twada kutta tommy with friends epic moments