रेल्वे स्टेशनवर व्हायरल झालेला 'तो' आवाज आता चित्रपटात!

वृत्तसंस्था
Friday, 23 August 2019

काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमधील रानाघाट रेल्वे स्थानकावर काम करणाऱ्या एका महिलेच्या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आत याच बाईंचा आवाज तुम्हाला मोठ्या पडद्यावर ऐकायला मिळाला तर आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण त्यांना एका चित्रपटात गाण्याची संधी मिळाली आहे. संगीतकार हिमेश रेशमिया यांनी या महिलेला आपल्या चित्रपटात गायची संधी दिली आहे.

राणू मोंडाल असे या महिलेचे नाव असून त्यांचा आवाज हुबेहुब गानकोकिळा लता मंगेशकर यांच्यासारखा आहे. रानाघाट स्टेशनवरील त्यांच्या व्हायल झालेल्या व्हिडिओत त्या 'एक प्यार का नगमा है' हे गाणे म्हणताना दिसतात. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांच्या आवाजाचे कौतुक केले होते. संगीतकार हिमेश रेशमिया यांनी त्यांच्या आवाजाची जादू ऐकून त्यांना 'हॅप्पी हार्डी अॅण्ड हीर' या चित्रपटात गाणे गाण्यासाठी निवडले आहे. 

गाणे गातानाचा त्यांच्या सरावाचा व्हिडिओ निर्माते राकेश उपाध्याय यांनी फेसबुकवर शेअर केला आहे. त्यामुळे लवकरच राणू यांचा आवाज मोठ्या पडद्य़ावर चित्रपटात ऐकायला मिळेल. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Himesh Reshammiya gives chance to singer