esakal | हिमेश रेशमियाँचं 'सुरूर २०२१' गाणं प्रदर्शित; चाहत्यांचे भरभरून कमेंट्स
sakal

बोलून बातमी शोधा

Himesh Reshammiya

हिमेश रेशमियाँचं 'सुरूर २०२१' गाणं प्रदर्शित; चाहत्यांचे भरभरून कमेंट्स

sakal_logo
By
स्वाती वेमूल

गायक आणि संगीत दिग्दर्शक हिमेश रेशमियाँने Himesh Reshammiya त्याचं नवीन अल्बम नुकतंच प्रदर्शित केलं आहे. हिमेशने 'सुरूर २०२१' Surroor 2021 हे गाणं प्रदर्शित केलं असून सोशल मीडियावर सध्या त्याचीच जोरदार चर्चा आहे. या गाण्यात पुन्हा एकदा हिमेशच्या जुन्या स्टाइलची झलक पाहायला मिळाली. 'हिमेश रेशमियाँ मेलडीज' या म्युझिक लेबलअंतर्गत त्याने हे नवीन गाणं चाहत्यांच्या भेटीला आणल आहे. युट्यूबवर या गाण्याला अवघ्या काही तासांतच दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर चाहत्यांनी व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (Himesh Reshammiya is Back With Album Surroor 2021 Fans Cant Keep Calm)

'बिग बॉस पुन्हा आलाय', 'टोपिवाला परत आलाय', 'आपल्या अनोख्या अंदाजात हिमेश परत आलाय', अशा अनेक कमेंट् चाहत्यांनी व्हिडीओवर केल्या आहेत. या म्युझिक अल्बममध्ये हिमेशसोबत अभिनेत्री उदिती सिंग झळकली आहे. कॉन्सर्टमध्ये गाणारा गायक आणि व्यावसायिक असे हिमेशचे दोन वेगवेगळे लूक यामध्ये पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा: 'द फॅमिली मॅन २'मधील प्रियामणीचं विद्या बालन कनेक्शन माहितीये का?

हेही वाचा: 'देवमाणूस' मालिकेत होणार 'या' अभिनेत्रीची एंट्री

हिमेश सध्या 'इंडियन आयडॉल १२'मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत आहे. गेल्या वर्षी त्याचा 'हॅपी, हार्डी अँड हीर' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्याने दुहेरी भूमिका साकारल्या होत्या. १९९८ मध्ये 'प्यार किया तो डरना क्या' या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनापासून करिअरची सुरुवात करणाऱ्या हिमेशने आजवर अनेक हिट गाणी गायली आहेत. २००७ मध्ये त्याने 'आप का सुरूर' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.