esakal | 'काय लिहावं कळत नाही'; वडिलांच्या आठवणीत हिना खान भावूक
sakal

बोलून बातमी शोधा

Hina Khan

'काय लिहावं कळत नाही'; वडिलांच्या आठवणीत हिना खान भावूक

sakal_logo
By
स्वाती वेमूल

टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानने Hina Khan २० एप्रिल रोजी तिच्या वडिलांना गमावलं. अस्लम खान Aslam Khan यांचं कार्डिअॅक अरेस्टने निधन झालं. वडिलांचं निधन झालं त्यावेळी हिना एका शूटिंगनिमित्त काश्मीरला गेली होती. निधनाचं वृत्त कळताच ती ताबडतोब तिथून आली. एकीकडे पितृशोक असताना दुसरीकडे हिनाला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे लगेचच तिला क्वारंटाइनमध्ये राहावं लागलं. वडिलांच्या निधनानंतर तिला आईचं सांत्वनही करायला मिळालं नाही. क्वारंटाइनमध्ये असताना हिना सोशल मीडियावर सक्रिय असून तिच्या वडिलांच्या अनेक आठवणी चाहत्यांसोबत शेअर करत आहे. (Hina Khan remembers late father says I dont know what to write)

हिनाने इन्स्टा पोस्ट आणि इन्स्टा स्टोरीमध्ये वडिलांसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. 'तुम्ही जिथे आहात तिथे खूश राहा. मला माहितीये तुम्ही आम्हाला पाहत असाल', असं कॅप्शन तिने या फोटोंना दिला आहे. आणखी एका पोस्टमध्ये हिनाचे वडील तिला मिठी मारताना दिसत आहेत. 'काय लिहू मला कळत नाहीये, तुमची फार आठवण येतेय', असं लिहित ती भावूक झाली.

हेही वाचा : 'छिछोरे'मधील अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचे कोरोनाने निधन

हिनाचे वडील तिला खूप लाड करायचे. त्यांच्यासोबतचे अनेक व्हिडीओ, फोटो ती सोशल मीडियावर सतत शेअर करायची. आता वडिलांचा आधार गेल्याने हिना खूप खचली आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित ती तिच्या भावनांना वाट मोकळी करून देत आहे.