हिना खानने सहा महिन्यातंच गाठला १ कोटी फॉलोअर्सचा टप्पा, पार्टीचे फोटो व्हायरल

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Wednesday, 4 November 2020

हिना सोशल मिडियावर खूप ऍक्टीव्ह असते. सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून ती कायम तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

मुंबई- बॉलिवूड सेलिब्रिटी सोशल मिडियावर चांगलेच ऍक्टीव्ह असतात. यातलंच एक प्रसिद्ध नाव म्हणजे अभिनेत्री हिना खान. हिना सोशल मिडियावर खूप ऍक्टीव्ह असते. सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून ती कायम तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

हे ही वाचा: गोव्यातील सरकारी जागेत सुरु होतं पुनमचं बोल्ड शुटींग

'बिग बॉस'मध्ये सहभागी झाल्यानंतर हिना खानचं एक वेगळं रुप आणि तिचा दिलखुलास अंदाज प्रेक्षकांच्या समोर आला होता. त्यानंतर तर दिवसेंदिवस तिच्या लोकप्रियतेमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत गेली.

अगदी सहा महिन्यांपूर्वी तिचे पाच मिलियन इन्स्टाग्राम फॉलोअर्स झाले होते आणि आता पाहता पहाता केवळ सहा महिन्यात तिने तब्बल १० मिलियन म्हणजेच १ कोटी चाहते तिला फॉलो करायला लागले आहेत. हिनाने एका खास पार्टीचं आयोजन करुन आपल्या मित्र-मंडळींसोबत हा आनंदाचा क्षण सेलिब्रेट केला. तिच्या या पार्टीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचच लक्ष वेधून घेत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

10 Million Strong Thank you  #10MillionHinaholics #10MillionInstaHearts

A post shared by HK (@realhinakhan) on

हिना खान छोट्या पडद्यावरील प्रसिदध अभिनेत्री आहे. २००९ साली ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘तुझ संग प्रित लगाई सजना’, ‘कस्तुरी’, ‘सपना बाबुल का बिदाई’, ‘साथ निभाना साथिया’ यांसारख्या अनेक डेली सोपमध्ये तिने लहानमोठ्या भूमिका साकारल्या. करिअरच्या सुरुवातीला काही मालिकांमध्ये तिने पाहुण्या कलाकाराची देखील भूमिका साकारली आहे.

एकता कपूरच्या ‘नागिन’ या प्रसिद्ध मालिकेमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली होती. मालिकांसोबतंच ‘नच बलिये’, ‘बिग बॉस’, ‘बॉक्स क्रिकेट लीग’, ‘किचन चँम्पियन’ यांसारख्या रिऍलिटी शोमध्ये देखील ती झळकली आहे. ‘स्मार्टफोन’ आणि ‘डॅमेज’ या दोन वेब सीरिजमध्ये तिने काम केलं आहे. मुकेश भट्ट निर्मित ‘हॅक्ड’ या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.  

hina khans grand celebration for 10m followers on instagram dont miss these pics  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hina khans grand celebration for 10m followers on instagram dont miss these pics