गोव्यातील सरकारी जागेत सुरु होतं पुनमचं बोल्ड शुटिंग

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 4 November 2020

सरकारी जागेत बोल्ड शुटिंग केल्याप्रकरणी तिच्याविरोधात एकाने पोलिसांत तक्रार दिली आहे. सरकारी जागेत अशाप्रकारचे चित्रिकरण करण्याची परवानगी पुनमला कोणी दिली असा सवाल त्या तक्रारदारानं विचारला आहे.

मुंबई - बॉलीवूडमध्ये जे काही निवडक वादग्रस्त अशी काही व्यक्तिमत्वं आहेत त्यात पुनम पांडेचा नंबर फार वरचा आहे. प्रसिध्दीसाठी ती काहीही करु शकते याची प्रचिती तिचे चाहते आणि नेटक-यांना आली आहे.

आपल्या अकाऊंटवरुन नादग्रस्त फोटो शेयर करणे, वादग्रस्त विधाने करुन प्रसिध्दीच्या झोतात राहणे पुनमला जमले आहे. आता ती तिच्या अशाच प्रकारच्या कृत्यामुळे वादात सापडली आहे. याचं कारण म्हणजे ती गोव्यातील एका सरकारी जागेत एक बोल्ड शुट करत होती. 

सरकारी जागेत बोल्ड शुटिंग केल्याप्रकरणी तिच्याविरोधात एकाने पोलिसांत तक्रार दिली आहे. सरकारी जागेत अशाप्रकारचे चित्रिकरण करण्याची परवानगी पुनमला कोणी दिली असा सवाल त्या तक्रारदारानं विचारला आहे. हे असे कृत्य म्हणजे आपणचं आपल्या संस्कृतीचं अधपतन केल्यासारखे आहे. तेव्हा यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे तक्रारीत म्हटले आहे.

यासगळ्या प्रकरणावर गोवा फॉरवर्ड या पक्षाने भाजप सरकार गोवा हे ' बोल्ड डेस्टिनेशन' म्हणून प्रमोट करू पाहत आहे का असा सवाल केला आहे. आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओसाठी नेहमीच  पूनम पांडे नेहमीच वादात सापडलेली दिसून येते. त्यामुळे ती आणखी एका पॉर्न व्हिडीओमुळे पुन्हा चर्चेत आली आहे.

याप्रकरणी काणकोण पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणाचा तातडीने तपास करण्यात येईल अशी माहिती दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक पंकज कुमार सिंग यांनी दिली. याअगोदर याच पोलीस ठाण्यात पूनमने आपला पती सॅम बॉम्बे याच्या विरोधात आपल्याला मारहाण करण्याची आणि विनयभंग करण्याची तक्रार नोंद केली होती. त्याच दरम्यान हा वादग्रस्त व्हिडिओही शूट झाला होता.

दोन महिन्यापूर्वी आपला हनिमून साजरा करण्यासाठी गोव्यात आलेल्या पूनमने काणकोण येथील चापोली धरणावर हा व्हिडिओ शूट केला होता. सध्या गोव्यात तो व्हायरल झाला आहे. या प्रकरणी काणकोणच्या एका स्थानिक युवकाने काणकोण पोलिसात तक्रारही दिली आहे. अशाप्रकारचा हा व्हिडीओ पाटबंधारे खात्याच्या मालकीच्या धरणावर कसा शूट केला गेला असा सवाल गोवा फॉरवर्डने प्रवक्ते प्रशांत नाईक यांनी केला आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complaint against Actress Poonam Pandey in madgoan police station