
मुंबई - संघर्ष कुणाला चुकला नाही. प्रयत्न आणि चिकाटीच्या जोरावर उत्तुंग यश मिळवलेले अनेक चेहरे आपल्याला आजूबाजूला दिसतात. प्रत्येक क्षेत्रात अशा यशस्वी व्यक्ती पाहायला मिळतात. आज जे मोठे सेलिब्रेटी आपल्याला लाईमलाईट मध्ये चमकताना दिसतात ते कोणेएकेकाळी प्रचंड संघर्ष करत होते. हे अनेकांना माहिती नसते. केवळ चित्रपटातील नव्हे तर मालिकांमधील कित्येक कलाकारांनी जिद्दीनं आपला वेगळा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेविषयी वेगळं सांगण्याची काही गरज नाही.सर्वाधिक लोकप्रिय असणारी मालिका म्हणून ती प्रसिध्द आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यत सर्वांना या मालिकेनं वेड लावले आहे. 2008 मध्ये सुरु झालेली ही मालिका तब्बल 12 वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील एक प्रसिध्द व्यक्तिरेखा म्हणजे बाघा. ती भूमिका करणारा लोकप्रिय कलाकार म्हणजे तन्मय वेकारिया. त्यानं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपली यशोगाथा सांगितली आहे. तन्मय हा तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत बाघाची व्यक्तिरेखा साकारतो. तन्मयचे वडिलही अभिनेता आहेत. त्यांची प्रेरणा घेऊन त्यानं कलाकार व्हायचं असा निर्धार केला. करिअरच्या सुरुवातीला तन्मय केवळ चार हजार रुपये पगारावर काम करत होता.
बाघा हा जेठालाल चंपकलाल गढा यांच्या दुकानात काम करतो. त्याची ती भूमिका प्रेक्षकांमध्ये कमालीची लोकप्रिय आहे. बाघाला सोशल मीडियावर मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. त्याचा फॅन फॉलोअर्स प्रचंड आहे. ते पात्र प्रेक्षकांच्या विशेष आवडीचं आहे. ती भूमिका साकारणारा तन्मय हा मुळचा गुजरातचा आहे. त्याचे वडिल अरविंद वेकारिया हेही कलाकार आहेत. त्यांनी अनेक गुजराती नाटकांमध्ये काम केले आहे. तन्मयलाही फार सहजासहजी बाघाची भूमिका मिळालेली नाही. त्य़ासाठी खूप मेहनत केली आहे. या मालिकेत काम करण्यापूर्वी तो एका मालिकेत वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करत होता. त्यात टॅक्सी ड्रायव्हर, ऑटो ड्रायव्हर, पोलिसाची भूमिका त्यानं केल्या आहेत.
2010 मध्ये बाघा नावाची व्यक्तिरेखा तयार झाली. त्यानंतर त्या व्यक्तिरेखेच्या वाट्याला मोठं यश मिळाले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तन्मय हा एका बँकेत कामाला होता. त्याठिकाणी त्यानं मार्केटिंग एक्झुकेटिव्हचे काम केले होते. या कामासाठी त्याला 4 हजार रुपये पगार मिळत होता. आता तो एका एपिसोडसाठी 22 हजार रुपयांचे मानधन घेतो अशी माहिती आहे. त्यानं यापूर्वी गुजराती कॉमेडी नाटक घर घर की कहानी मध्ये काम केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.