हिंदी नाट्य स्पर्धेत ‘सवेरेवाली गाडी’ प्रथम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 मार्च 2019

कोल्हापूर - येथे महिनाभर रंगलेल्या राज्य हिंदी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत दादरच्या कलाकृती संस्थेच्या ‘सवेरेवाली गाडी’ या नाटकाने पहिला क्रमांक पटकावला. दुसरा व तिसरा क्रमांक अनुक्रमे पुण्याच्या उद्‌गार संस्थेच्या ‘बैतुल सुरूर’ आणि नागपूरच्या बहुजन रंगभूमी संस्थेच्या ‘भारतीय रंगमंच के आद्य नाटककार भदन्त अश्‍वघोष’ या नाटकांनी पटकावला. 

कोल्हापूर - येथे महिनाभर रंगलेल्या राज्य हिंदी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत दादरच्या कलाकृती संस्थेच्या ‘सवेरेवाली गाडी’ या नाटकाने पहिला क्रमांक पटकावला. दुसरा व तिसरा क्रमांक अनुक्रमे पुण्याच्या उद्‌गार संस्थेच्या ‘बैतुल सुरूर’ आणि नागपूरच्या बहुजन रंगभूमी संस्थेच्या ‘भारतीय रंगमंच के आद्य नाटककार भदन्त अश्‍वघोष’ या नाटकांनी पटकावला. 

पुण्याच्या स्वतंत्र कला ग्रुपच्या ‘ताजमहाल का टेंडर’ या नाटकाला चौथा क्रमांक मिळाला. दरम्यान, सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात १ फेब्रुवारी ते ६ मार्च या काळात ही स्पर्धा झाली. त्यात एकूण ५१ प्रयोग सादर झाले. सुरेश गायधनी, विद्यासागर अध्यापक, सोनिका ठक्कर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. 

स्पर्धेचा सविस्तर अनुक्रमे निकाल असा...
 दिग्दर्शन ः वर्षा दांदळे (सवेरेवाली गाडी), यश रुईकर (बैतुल सुरूर), अरुण कदम (आओ प्यार करे)

नाट्यलेखन ः अरुण कदम (आओ प्यार करे), वर्षा दांदळे (सवेरेवाली गाडी), ॲड. शैलेश गोजमगुंडे (मुक्ति)

 नेपथ्य ः सुनील घेरडे (बैतुल सुरूर), अरुण कदम (आओ प्यार करे), अरुण कदम (कोमल गंधार)

काशयोजना ः विनोद राठोड (सवेरेवाली गाडी), किशोर बत्तासे (भारतीय रंगमंच के आद्य नाटककार भदन्त अश्‍वघोष), 
संकेत देशपांडे (छत्री की अनकही बारीश)

रंगभूषा ः व्ही. जे. गणवीर (भारतीय रंगमंच के आद्य नाटककार भदन्त अश्‍वघोष), देवा सरकटे (एक रंगबावरा), रमेश श्रवण (कथा एक कंस की)

अभिनय रौप्यपदके - अश्‍विन शर्मा (ताजमहाल का टेंडर), मयूर पाटील (नंगी आवाजे), अनुराग वानखेडे (नो-नो मो-मो), श्रेयस अतकर (भारतीय रंगमंच के आद्य नाटककार भदन्त अश्‍वघोष), अशोक पालवे (एक रंगबावरा), वर्षा दांदळे (सवेरेवाली गाडी), दीप्ती दांडेकर (डार्क प्लस, मायनस लाईट), संपदा सोनटक्के (आओ प्यार करे), वीणा मेहता (जर्द मौसम), प्राची मंत्री (चौखट)

अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्रे - सिध्दी गुंफेकर (थोडा है थोडे की जरूरत है), डॉ. रिध्दी कुळकर्णी (ताजमहल का टेंडर), सानिका आपटे (छत्री की अनकही बारीश), मृगजा करंदीकर 
(साकाव), संगीता कुलकर्णी (सिहाय मंटो), पूजा पिंपळगावकर (फतवा), सोनिया गुप्ता (खंडहर), मिहिका शेंडगे (कथा एक कंस की), श्रुती कुलकर्णी (बैतुल सुरूर), नभा जाघव (सिहाय मंटो), नीलेश यादव (द केज), ऋतिक पुराणिक (देहरा), अभिजित वाईकर (लागा चुनरी पे दाग), आबा नाईक (इथर), अभिषेक अरांदेकर (परं निधानम्‌), सचिन जगताप (मुक्ति), शुभम जीते (बैतुल सुरूर), घनश्‍याम घोरपडे (सवेरेवाली गाडी), अरुण कदम (आओ प्यार करे), यशराज पेडणेकर (डार्क प्लस मायनस लाईट).
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hindi drama competition Saveriwali Gadi First