Bigg Boss 16: टिना इज बॅक अन् शालीनचा वाजला बॅण्ड! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss 16
 Salman Khan 
 Shalin Bhanot

Bigg Boss 16: टिना इज बॅक अन् शालीनचा वाजला बॅण्ड!

'बिग बॉस 16' हा शो दिवसेंदिवस रंगत आहे. जसं जसे दिवस संपत आहेत तसंतसं 'बिग बॉस 16' मध्ये खूप ड्रामा पाहायला मिळत आहे. या वेळी शनिवार का वारमध्ये सलमान खानने सुंबुल तौकीर खान आणि टीना दत्ता यांचं नशीब शालीन भानोटवर सोडलं होते. शोच्या बक्षीस रकमेतून २५ लाख रुपये कमी करून तो त्याला बेघर होण्यापासून वाचवू शकेल अशी शक्ती त्याने शालीनला दिली. अशा परिस्थितीत शालीनने बजर दाबला नाही आणि सुंबूलसोबत टीनाचाही प्रवास शोमधून संपला. मात्र यानंतर बिग बॉसने संपूर्ण खेळाच रूप बदलून लावलं..

हेही वाचा: Bigg Boss 16: सलमानचा जलवा अन् स्पर्धकांचे राडे! बिग बॉसने केली रेकॉर्ड ब्रेक कमाई

झालं असं, टीनाच्या एलिमिनेशननंतर शालीन खूप रडाला टीना घरातून बाहेर पडली तेव्हा तो खुपच निराश झाला होता. पण त्यानंतर काही तासांतच बिग बॉसने खेळच बदलला. अलीकडेच शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये टीना शोमध्ये परत आली आहे. अशा स्थितीत तिला पाहून शालीनला धक्का बसतो. त्यांनतर तर टिना शालीनची चांगलीच शाळा घेते.

हेही वाचा: सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

शोमध्ये परत येताच टीनाने शालीनचा बँड वाजवायला सुरुवात केली आणि तिने त्याला फटकारले. टीना म्हणते, 'आता मी परत आले आहे, मी गेल्यानंतर तू नाचत होतास. आणि जर तुम्ही मित्राचे नसाल तर तुम्ही कोणाचेही होऊ शकत नाही.' आता येत्या एपिसोड्समध्ये शालीन आणि टीनामध्ये पुढे काय होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.