esakal | महिला दिनी 'असे' फोटो; रश्मी झाली ट्रोल  
sakal

बोलून बातमी शोधा

Hindi serial actress rashami desai bold photo Rashmi desai l

रश्मीनं महिला दिनाच्या निमित्तानं एक संदेशही व्हायरल केला आहे. त्यालाही नेटक-यांनी लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत.

महिला दिनी 'असे' फोटो; रश्मी झाली ट्रोल  

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सध्या सगळीकडे महिलांचा गौरव होत असताना दुसरीकडे त्या औचित्यानं काही वेगळं करुन लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रश्मी देसाईचा समावेश आहे. तिनं बोल्ड फोटोशुट करुन एका नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. त्यामुळे तिला काही प्रमाणात टीकेलाही सामोरं जावं लागलं आहे. अनेकांनी तिला किमान आजच्या दिवशी तरी असे फोटोशुट टाळायला हवे होते. अशा प्रतिक्रिया नेटक-यांनी रश्मीला दिल्या आहेत. सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असणा-या रश्मीनं फोटोशुटमधून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

रश्मीनं महिला दिनाच्या निमित्तानं एक संदेशही व्हायरल केला आहे. त्यालाही नेटक-यांनी लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत. रश्मीनं जो फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे त्यात ती हॉट दिसत आहे. तिच्या त्या फोटोंना मोठ्या प्रमाणावर कमेंट आल्या आहेत. चाहत्यांनी तिच्या फोटोचे कौतूकही केले आहे. तर काहींनी ट्रोल करुन तिच्यावर टीकाही केली आहे. रश्मीनं सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रश्मीनं इंस्टावर जो एक फोटो शेअर केला आहे त्यात तिनं म्हटलं आहे की, आजचा दिवस महिलांसाठी खास आहे. महिलांमध्ये असे एक खास वैशिष्ट्य आहे ज्यामुळे एखादा पुरुष तिच्याक़डे आर्कर्षित होतो. मात्र त्यासाठी तिला शक्ति, साहस, आत्मविश्वास, निडरता या गुणांची आवश्यकता असते. हे लक्षात घ्यायची गरज आहे. सर्वात शेवटी महिला म्हणजे समाजाच्या शिल्पकार आहेत. सर्व महिलांना मी मनापासून शुभेच्छा देते.

रश्मीच्या त्या फोटोला युझर्सनं लिहिलं आहे की, सिध्दार्थला हा फोटो खुप आवडेल. तर एका इंस्टा युझर्सनं लिहिलं आहे, हॉट. अनेकांनी तिच्या त्या फोटोंना हॉट चा इमोजी शेअर करुन तिचे कौतूक केले आहे. नागिनची अभिनेत्री असणा-या रश्मीनं फॅबलुक मॅगेझीनसाठी फोटोशुट केले आहे. तिनं तिचे फोटो इंस्टाला शेअर केले आहेत. डीप नेक कोटमध्ये तिचा लुक भलताच हॉट दिसतो आहे. त्यावर तिनं व्हाईट कलरचा नेक स्कर्टही घातला आहे. 
 
 

loading image