Hirkani Teaser : 'अजून आख्खा कडा बाकी आहे...'; 'हिरकणी'चं टीझर बघितलं का?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

होता समोर अंधार
सोबतीला नाही कोणी
केला एकच निर्धार
उतरली 'हिरकणी'...!!!

माय माऊली हिरकणीची आपल्या बाळासाठी असलेली ओढ आणि केवळ आपल्या बाळासाठी गडाची कडा उतरण्याची जोखीम उचलणा-या ‘हिरकणी’ची झलक नुकतीच प्रदर्शित झाली आहे.

होता समोर अंधार
सोबतीला नाही कोणी
केला एकच निर्धार
उतरली 'हिरकणी'...!!!

हे फक्त एक पाऊल आहे
अजून आख्खा कडा बाकी आहे...

प्रसाद ओक दिग्दर्शित आणि चिन्मय मांडलेकर लिखित ‘हिरकणी’ सिनेमाच्या टीझरने अक्षरश: अंगावर शहारे येतात. सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद झाल्यामुळे आपल्या तान्ह्या बाळाला भेटण्यासाठी व्याकूळ असलेली आई हिरकणीची झलक पाहून अनेकांची या सिनेमा प्रती उत्सुकता वाढणार यात शंका नाही. तसेच, सोनालीला हिरकणीच्या भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते देखील नक्कीच आतुर झाले असतील. सोनालीसह अभिनेता अमित खेडेकर देखील या सिनेमात प्रमुख भूमिका साकारत आहे.

प्रसाद ओक दिग्दर्शित ‘हिरकणी’ सिनेमाची निर्मिती इरादा एंटरटेनमेंटच्या फाल्गुनी पटेल आणि सहनिर्मिती लॉरेन्स डिसुझा यांनी केली आहे. राजेश मापुस्कर हे या सिनेमाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. येत्या दिवाळीत २४ ऑक्टोबरला ‘हिरकणी’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hirkani marathi movie teaser launched