खेळताना रंग बाई होळीचा, तोल सुटला शर्लिनचा! घडलं भलतंच!| Holi 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Holi 2023 Sherlyn chopra tv entertainment actress

Holi 2023 : खेळताना रंग बाई होळीचा, तोल सुटला शर्लिनचा! घडलं भलतंच!

Holi 2023 Sherlyn chopra Bold Dance Video : शर्लिन चोप्रा हे नाव माहिती नाही असे होण्याची शक्यता कमी आहे. ती आपल्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर हॉट व्हिडिओ शेयर करुन चाहत्यांची पसंती मिळवणाऱ्या शर्लिनचा होळीच्या निमित्तानं एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये शर्लिनचा वेगळाच अंदाज दिसून आला आहे.

बॉलीवूड आता होळीच्या निमित्तानं वेगवेगळ्या रंगांमध्ये न्हाऊन निघाले आहे. अनेक सेलिब्रेटींनी मोठमोठ्या पार्टींचे आयोजन केले आहे. यात टीव्ही मनोरंजन विश्वातील सेलिब्रेटी देखील मागे नाहीत. त्यांनी देखील स्वतंत्रपणे काही कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यासगळ्यात प्रसिद्ध सेलिब्रेटी शर्लिन ही तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत आली आहे. तिचा तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी तिला दिलेल्या कमेंटस भन्नाट आहे.

Also Read - परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर

बॉलीवूडची मायानगरी म्हणून मुंबईची वेगळी ओळख आहे. या शहरामध्ये मोठ्या संख्येने सेलिब्रेटी राहतात. ते वेगवेगळ्या सणांच्या निमित्तानं एकत्र येऊन तो सण साजरा करतात. त्याला अनेक वर्षांची परंपरा आहे. यावेळी बॉलीवूडचे जे ज्येष्ठ कलाकार आहेत त्यांच्यावतीनं आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन त्या महोत्सवाचा आनंद लुटताना दिसतात. दरम्यान काही सेलिब्रेटींच्या व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओच्या निमित्तानं त्या उत्साही उत्सवाची चर्चा होताना दिसते.

शर्लिननं देखील होळीतील त्या इव्हेंटचा मनापासून आनंद घेतला आहे. त्यावेळी ती इतक्या जोशमध्ये होती की, आपण काय करतो आहोत याचे भान तिला नसल्याचे दिसून येत आहे. ढोल वाजविणाऱ्यासोबत शर्लिन हरवून गेली होती. त्यावर तिला आलेल्या प्रतिक्रिया देखील भलत्याच भन्नाट आहेत. शर्लिनचे भान हरपले, शर्लिनचा होळीचा उत्साह कौतूकास्पदच म्हणावा लागेल. अशा शेलक्या प्रतिक्रिया तिला मिळाल्या आहेत.

शर्लिननं तिच्या इंस्टावरुन एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामध्ये तिचा उत्साह दिसून येतो आहे. व्हाईट कलरच्या ड्रेसमध्ये तिनं उपस्थितांची चांगलीच दाद मिळवली आहे. तिचा तो बिनधास्त अंदाज चाहत्यांच्या, नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा विषय होतो आहे.