
Dev Patel: स्लमडॉगच्या अभिनेत्यानं रस्त्यावरील 'चाकूहल्ला' थांबवला!
Hollywood actor dev patel risked his life for stranger: स्लमडॉग मिलेनियरमधून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारा अभिनेता देव पटेल आता मोठा अभिनेता झाला आहे. त्यानं आतापर्यत हॉलीवूडच्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समधून काम केले आहे. त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. सध्या देव एका वेगळ्या कारणासाठी (hollywood movie news) चर्चेत आला आहे. ऑस्ट्रेलियातील एका शहराता रस्त्यावर सुरु असणाऱ्या हाणामारीत देवनं भाग घेऊन ती हाणामारी थांबवण्याचे (entertainment news) काम त्यानं केलं आहे. अभिनेत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव होताना दिसतो आहे.
देव हा त्याच्या वेगवेगळ्या सार्वजनिक उपक्रमांमध्ये भाग घेण्याबद्दल देखील ओळखला जाणारा अभिनेता आहे. बऱ्याच काळापासून तो हॉलीवूडशी संबंधित आहे. आपण केवळ पडद्यावरच नाही तर रियल लाईफमध्ये देखील आदर्श नागरिक, व्यक्ती आहोत याचा परिचय देवनं करुन दिला आहे. द टेलिग्राफनं दिलेल्या माहितीनुसार, अॅडलेडमध्ये रस्त्यावर चाकूबाजी सुरु असताना ती थांबवण्यासाठी त्यानं पुढाकार घेतल्याचे दिसून आले. स्वताचा जीव धोक्यात घालून त्यानं हे काम केल्यानं सोशल मीडियावरुन देववर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.
अभिनेता देव हा ऑस्ट्रेलियातील अॅडलेडमध्ये एका कंपनीच्या स्टोअरमध्ये होता. त्यावेळी त्यानं पाहिलं की, एक युवक आणि युवतीमध्ये वादावादी सुरु झाली आहे. त्यांचा राग अनावर होऊन त्यांनी चाकूबाजी करायला सुरुवात केली आहे. अशावेळी देवनं तातडीनं त्याठिकाणी धाव घेत, स्वताचा जीव धोक्यात घालून त्यांना त्या प्रसंगातून बाहेर काढले. देव त्यावेळी त्याच्या मित्रांसोबत हजर होता. त्या दोघांची चाकूबाजी एवढी जोरात सुरु होती की, त्या तरुणीनं तरुणाच्या छातीत चाकू खूपसला होता. त्याचवेळी देवनं त्या युवकाची त्या प्रसंगातून सुटका करत त्याच्यासाठी रुग्णसेवा देण्यासाठी पुढाकार घेतला.
हेही वाचा: Video: 'आई कुठे काय करते' या मालिकेतील मंगळागौर
अभिनेत्याच्या प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार, देवनं तो वाद मिटवल्यानंतर घटनास्थळी राहणे पसंत केले. पोलिसांच्या चौकशीला तो सामोरा गेला. ज्या युवकावर चाकूनं वार करण्यात आले तो 32 वर्षांचा आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हेही वाचा: 'जो स्त्रीचा अपमान करेल...'; संजय राऊतांवरील कंगनाचं वक्तव्य Viral
Web Title: Hollywood Actor Dev Patel Take The Risk To Stop The Crime Happened On Australia Street Viral
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..