Angelina jolie: इसको बोलते डेरिंग! युक्रेनमध्ये जाऊन घेतली विस्थापितांची भेट|Hollywood Actress Angelina Jolie | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Angelina Jolie

Angelina jolie: इसको बोलते डेरिंग! युक्रेनमध्ये जाऊन घेतली विस्थापितांची भेट

Hollywood News - हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जोली (Angelina Jolie) ही आता भलतीच चर्चेत आली आहे. त्याचे कारण म्हणजे तिनं युक्रेनमध्ये जाऊन विस्थांपितांची भेट घेतली आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. सध्या युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध भडकले आहेत. ते (Viral News) अजुनही शमलेले नाही. त्याचे पडसाद साऱ्या देशावर उमटल्याचे दिसून आले आहे. जगातील इतर देशांवर त्याचे परिणाम झाले आहेत. बाजापेठांमध्ये तेलाच्या किंमती वाढल्या आहे. मनोरंजन क्षेत्रातील अनेक सेलिब्रेटींनी रशियाचा निषेध करुन त्यावर आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता हॉलीवूडची अभिनेत्री एँजेलिना जोली हिनं युक्रेनमध्ये जावून तेथे विस्थापितांची भेट घेतली असून त्यामुळे ती चर्चेत आली आहे.

दिवसेंदिवस रशिया आणि युक्रेनची स्थिती खराब होत चालली आहे. एँजेलिनाला युक्रेनमधील एका शहारात स्पॉट करण्यात आले होते. तिचा तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापूर्वी अँजेलिनानं रशिया युक्रेन युद्धावर खंत व्यक्त करत रशियाच्या अध्यक्षांवर निशाणा साधला होता. त्यामुळे तिला सोशल मीडियावरुन नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देऊन तिचा उत्साह वाढवला होता. अजुनही युक्रेनमधील युद्धाचे ढग कायम आहे. यावेळी अँजेलिनाच्या दिमतीला युनायटेड किंग्डमची फौजही होती. ती यावेळी विशेष दूत म्हणून त्याठिकाणी गेली होती.

युक्रेनमध्ये जाऊन अँजेलिनानं तेथील विस्थापितांची भेट घेतली आहे. त्यांची विचापूस केली आहे. त्यामुळे तिच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. दरम्यान अँजेलिनानं रोम या देशाचा देखील दौरा केला होता.त्यात तिनं त्या देशांतील वेगवेगळे प्रश्न समजावून घेत त्यासंबंधी आपली रोखठोक प्रतिक्रियाही दिली होती. जी सोशल मीडियावरुन व्हायरल झाली होती.