Jerry Lee Lewis Passed Away: अमेरिकन रॉक पायनियर हरपला...जेरी ली लुईस याचं वयाच्या ८७ व्यावर्षी निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jerry Lee Lewis Passed Away

Jerry Lee Lewis Passed Away: अमेरिकन रॉक पायनियर हरपला...जेरी ली लुईस याचं वयाच्या ८७ व्यावर्षी निधन

अमेरिकन गायक जेरी ली लुईस आता या जगात नाही. जेरी ली लुईस यांनी वयाच्या 87व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते दिर्घ काळापासून आजारी होते. लुईस यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्याने संगीत क्षेत्रात खळबळ उडाली होती मात्र ती अफवा असल्याचे सांगितले जात होते अखेर आज याची अधिकृत माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: Hollywood चा सुपरस्टार ब्रॅड पीटला वाराणसीची पडली भुरळ, म्हणाला...

अमेरिकन रॉक पायनियर  म्हणुन ओळख असलेल्या जेरी ली लुईस यांच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त होत आहे. जेरी “ग्रेट बॉल्स ऑफ फायर” आणि "होल लोटा शकिन' गोइन' ऑन" सारख्या हिट गाण्यासाठी ओळखले जाते. जेरी ली लुईस यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. 2019 मध्ये त्यांना हृदयविकाराचा झटकाही आला होता. त्यानंतर ते आजारीच होते.

हेही वाचा: Big Boss 16: 'मला तुझी गरज नाही'! शालीन अन् सुंबुलमध्ये बिनसलं...

 जेरी ली लुईस त्याच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यासाठीही खूप प्रसिद्ध होता. 1950 मध्येही जेरी खूप चर्चेत आले होते. जेरी ली लुईसने रॉक रिबेल बनून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जेरीने अनेक लोकप्रिय गाणी गायली आहेत.जेरींचे गाणे त्याच्या चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध होती. त्याची शैली सर्वांनाच आवडायची. त्याची फॅन फॉलोइंगही खूप तहडी होती. जेरीच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे.

हेही वाचा: Big boss:''तुमचं नशीब तुमची आई ठरवणार'';सलमान असं का म्हणाला?

जेरी ली लुईसची कारकीर्द 1958 मध्येच संपली. त्यामागचं सर्वात मोठे कारण हे त्याचं लग्न ठरलं. खरं तर त्यानं आपल्याच 13 वर्षांच्या चुलत बहिणीशी लग्न केले होतं. याशिवाय तो आधीच विवाहित होता. ही बातमी समोर आल्यानंतर याचा मोठा परिणाम त्याच्या करिअरवर परिणाम झाला. त्याचे शो रद्द होत होते. एवढेच नाही तर त्याला रेडिओवरून ब्लॅक लिस्ट करण्यात आलं होतं.